महावितरणच्या अभियंत्याला मारहाण करणं भोवलं; कोर्टाने सुनावली 'ही' शिक्षा (File Photo : Court)
बायकोच्या बहिणीवर म्हणजेच मेहुणीवर बलात्कार केल्याप्रकरणात अलाहाबाद हायकोर्टाने आरोपी नवऱ्याला मोठा दिलासा दिला आहे. भावोजी-मेहुणीमधील संबंध जरी अनैतिक असले तरी ती महिला संज्ञान असेल तर याला बलात्कार म्हणता येणार नाही, असा निर्णय हायकोर्टाचे दिला आहे. मेहुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला जुलै 2024 मध्ये अटक करण्यात आली होती आणि आता त्याला हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आरोपी नवऱ्याला मोठा दिलासा मिळाला.
न्यायमूर्ती समीर जैन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. लाइव्ह लॉच्या रिपोर्टनुसार, अर्जदाराच्या वकिलाने कोर्टाला सांगितले की, या प्रकरणात आरोपी व्यक्तीवर खोटे आरोप करण्यात आले आहेत. त्यांनी खंडपीठाला सांगितले की, भावोजी आणि मेहुणी यांच्यात अनैतिक संबंध आहेत. याप्रकरणी तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोर्टाला सांगण्यात आले की, कथित पीडित मुलगी संज्ञान आहे आणि तिने CrPC च्या कलम 161 अंतर्गत दिलेल्या निवेदनात आरोप नाकारले आहेत. पण पीडितेने नंतर जबाब CrPC च्या कलम 164 अंतर्गत बदलला आणि फिर्यादीच्या केसला समर्थन दिले. जामिनाला विरोध करणारे AGA हे सत्य नाकारू शकले नाहीत की कथित पीडित मुलगी संज्ञान आहे आणि रेकॉर्डने हे माहिती पडत नाही की तिने सहमती दिली नाही.
सुनावणीदरम्यान, कोर्टाने आरोपीवरील आरोप, दोन्ही पक्षांचे युक्तिवाद आणि कथित पीडितेने सुरुवातीला आरोप नाकारले आणि नंतर तिचे म्हणणे बदलले हे देखील विचारात घेतले. यासोबतच, कोर्टाने हे देखील सांगितले की, तिने अर्जदार आणि एका विवाहित पुरुषाशी संबंध बनवले होते.
अशा स्थितीमध्ये कोर्टाने सांगितले की, हे संबंध अनैतिक आहे. पण कथित पीडित मुलगी संज्ञान असल्याने त्याला बलात्कार मानले जाऊ शकत नाही. कोर्टाने याचा देखील विचार केला की, अर्जदार आणि पीडित यांच्यात अनैतिकसंबंध निर्माण झाले होते. आरोपीचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही आणि त्याला जुलै 2024 मध्ये अटक करण्यात आली. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन कोर्टाने आरोपीला जामीन मंजूर केला.