नवी दिल्ली : तीन तलाकविषयी (Triple Talaq) आजवर आपणं सगळ्यांनीचं ऐकलं असेल. नवरा-बायकोमध्ये जरासा वाद झाल्यावर नवऱ्याने तीनदा तलाक म्हणत बायकोला सोडल्याची अनेक प्रकरणं आजवर घडली आहेत. अशीच एक धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) बँगलोर एअरपोर्टवरून एका 40 वर्षीय डॉक्टरला त्याने बायकोला ट्रिपल तलाक दिल्याच्या आरोपावरून अटक केली आहे.
[read_also content=”धक्कादायक – गुगलचं पुण्यातलं ऑफिस उडवण्याची धमकी, मुंबईतल्या बीकेसीमधील कार्यालयात ‘या’ माणसाने केला फोन, म्हणाला… https://www.navarashtra.com/maharashtra/bomb-threat-to-pune-google-office-caller-called-in-mumbai-bkc-office-nrsr-369380.html”]
ब्रिटनला पळून जाण्याचा प्लॅन
आश्चर्याची बाब ही आहे की आरोपी आपल्या बायकोला तीन तलाक देऊन ब्रिटनला पळून जात होता. वेळीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. दिल्ली पोलिसांच्या मते त्याच्या 36 वर्षांच्या बायकोने कल्याणपुरीमध्ये(Kalyanpuri) पोलिसांकडे तक्रार केली होती. तिने सांगितलं की ही तलाकची घटना 13 ऑक्टोबर 2022 ला घडली होती.
तलाक का दिला ?
मीडिया रिपोर्टनुसार, लग्नानंतर एका वर्षातच आरोपी परीक्षेची तयारी करायची असल्याचे सांगून कल्याणपुरी भागातील विनोदनगरमध्ये राहायला गेला. मात्र तो दुसऱ्या ठिकाणी राहायला गेल्यापासून पत्नीला संशय येऊ लागला. तिला नवऱ्याची वागणूक बदललेली दिसली. नक्की काय प्रकार घडलाय हे जाणून घ्यायचा ती प्रयत्न करत होती. ती जेव्हा आपल्या नवऱ्याला भेटायला गेली तेव्हा तिने बघितलं की तिचा नवरा दुसऱ्या बाईसोबत राहतोय. तिला धक्का बसला. नवऱ्याने तिला मारहाण केली आणि लिव्ह इन पार्टनरसमोर तिला ‘तीन तलाक’ दिला.
तीन तलाक कायदा
पूर्वी तीन वेळा तलाक तलाक तलाक म्हणून अनेक जण आपल्या बायकोला सोडून द्यायचे. मात्र आता असं करणं हे बेकायदेशीर आहे. आता कायद्यात अशी तरतूद आहे की समजा कोणत्या नवऱ्याने आपल्या बायकोला तीन वेळा तलाक म्हणून सोडलं तर त्याला तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. तसेच वॉरंटशिवाय त्याला पोलीस अटक करु शकतात.