आधी 150 वेळा फोन केला अन् नंतर सासरी जाऊन पत्नीची केली हत्या; कर्नाटकात कॉन्स्टेबलचं निर्दयी कृत्य

कर्नाटकात एका पोलीस हवालदाराने फोनला उत्तर न दिल्याने पत्नीची हत्या (Wife Murder) केली. ही घटना सोमवारी (दि.6) घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पत्नीने 11 दिवसांपूर्वी मुलाला जन्म दिला होता. प्रसूतीनंतर ती होस्कोटे येथील तिच्या माहेरी होती.

    बंगळुरू : कर्नाटकात एका पोलीस हवालदाराने फोनला उत्तर न दिल्याने पत्नीची हत्या (Wife Murder) केली. ही घटना सोमवारी (दि.6) घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पत्नीने 11 दिवसांपूर्वी मुलाला जन्म दिला होता. प्रसूतीनंतर ती होस्कोटे येथील तिच्या माहेरी होती. माहितीनुसार, आरोपी हवालदार चामराजनगरमध्ये राहतो. त्याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. तो तिचे कॉल डिटेल्स आणि मेसेज तपासत राहिला. घटनेच्या एक दिवस आधी 5 नोव्हेंबर रोजी दोघांमध्ये वाद झाला होता.

    किशोरने पत्नीला फोन करून काही कारणावरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पत्नीने रडत असतानाच तिची आई व्यंकटलक्षम्मा यांनी कॉल कट केला. त्यांनी प्रतिभाला सांगितले की, ती जर रडत राहिली तर तिच्या नवजात बाळाच्या आरोग्यावर परिणाम होईल. दुसऱ्या दिवशी प्रतिभाला किशोरने दीडशे वेळा फोन केल्याचे समजले.

    याबाबत पत्नीने तिच्या पालकांना माहिती दिली. यानंतर किशोर 230 किलोमीटर प्रवास करत पत्नीच्या माहेरी पोहचला. यावेळी त्याने प्रथम स्वतः कीटकनाशक प्राशन केले आणि पत्नीचा गळा आवळून खून केला. या घटनेने एकच खळबळ उडाली.