Dinvishesh : भारतीय बॅडमिंटनची सुवर्णकन्या पी. व्ही. सिंधू हिचा वाढदिवस; जाणून घ्या ०५ जुलैचा इतिहास (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Dinvishesh : भारतीय बॅडमिंटनला जागतिक स्तरावर नवीन ओळख मिळवूनम देणारी स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू हिचा जन्म ०५ जुलै १९९५ रोजी हैदराबाद येथे तिचा जन्म झाला होता. तिच पूर्ण नाव पुर्सला वेंकट सिंधू आहे. लहानपणापासूनच सिंधूला बॅडमिंटनची आवड होती. तिने पुलेला गोपिचंद यांच्या मार्गदर्शनखाली कठोर मेहनत घेतली. ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे. २०१९ मध्ये तिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदत मिळवले होते. तिच्या बॅडमिंटन क्षेत्रातील या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पद्मश्री, राजवी गांधी खेलरत्न आणि पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर सिंधूने भारतीय क्रीडाक्षेत्रात आपली एक वेगळी छाप उमटवली आहे.
05 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
05 जुलै रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)






