नवी दिल्ली : फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूबसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (Social Media) खाकी वर्दीमध्ये रिल्स बनवणाऱ्या पोलिसांवर चाप लावण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. सीआरपीएफने आपल्या जवानांना कुणाशीही नकळत ऑनलाइन मैत्री करू नका, असे सांगितले आहे. याशिवाय फोटो अपलोड करतानाही काळजी घ्या, कारण अशाप्रकारे ते हनीट्रॅपचे (Honey Trap) शिकार बनू शकतात.
जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘अनेक जवान त्यांच्या गणवेशात व्हिडिओ आणि फोटो अपलोड करतात. याशिवाय अनेकांना मेसेजही पाठवतात. गुप्तचर यंत्रणांनी वेगवेगळ्या निमलष्करी दल आणि पोलिस दलांना पत्रे जारी केली आहेत. याला त्यांचे व्हिडीओ (रिल्स) युनिफॉर्ममध्ये अपलोड करू नयेत आणि अनोळखी लोकांशी ऑनलाइन मैत्री करू नये, असे म्हटले आहे. या सूचनांचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.
आयटीबीपी आणि बीएसएफने त्यांच्या जवानांना सीमेजवळील भागात व्हिडीओ बनवू नका, असे सांगितले आहे. ही बाब देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. या महिन्यात विशाखापट्टणममध्ये तैनात असलेला एक सीआयएसएफ जवान हनी ट्रॅपमध्ये अडकला होता. तो पाकिस्तानच्या एका महिला गुप्तचर अधिकाऱ्याच्या संपर्कात होता आणि अनेक संवेदनशील नियंत्रण कक्षात फोन करत होते.
प्रसारित करू नये. देशहित किंवा अंतर्गत सुरक्षेच्या विरोधातील कोणतेही साहित्य सोशल मीडियावर पोस्ट करू नये. सोशल मीडियावर टाकलेला मजकूर बेकायदेशीर, अश्लील, मानहानीकारक, धमकावणारा किंवा अधिकारांचा गैरवापर नये.
पोलिसांनो, खाकीची प्रतिष्ठा राखा
दिल्लीचे पोलिस आयुक्त संजय अरोरा यांनीही एक पत्र जारी केले आहे की, अटक केलेल्या व्यक्तींशी संबंधित किंवा ट्रायल असलेल्या व्यक्तींशी संबंधित टिप्पण्या सोशल मीडियावर पोस्ट करू नयेत. खाकी वर्दीची प्रतिष्ठ राखण्यासाठी रिल्स किंवा व्हिडिओ बनवताना पोलिस यंत्रणेचे कोणतेही उपकरण किंवा साहित्य वापरू नका. असे निर्देश पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.