मुंबई : पुढच्या २ दिवसांमध्ये केरळ (Kerala) आणि लक्षद्वीपमधील काही ठिकाणी मुसळधार पावसाची (Possibility Of Rain) शक्यता आहे. हवामान विभागानं याविषयी अंदाज व्यक्त केला आहे. केरळमध्ये पश्चिमी वाऱ्यांमुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात विषववृत्त ओलांडून नैऋत्येकडे झेपवणारे बळकट दमदार पावसाळी वारे तसेच ताशी ४५ किमी झटक्याखाली पुढील ५ दिवस वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आज अंदमान, निकोबार बेटे व आग्नेय बंगालच्या उपसागरात मान्सून दाखल होण्याची शक्यता जाणवत असल्याचे मत हवामान तज्ञांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, राज्यातही पावसाची शक्यता (Monsoon News) हवामान विभागाने वर्तवली आहे.
[read_also content=”श्रीलंकेच्या संकटामुळे प्रेयसीची झाली पत्नी! टुरिस्ट व्हिसावर आलेल्या मुलीने युपीच्या मुलाशी केले लग्न https://www.navarashtra.com/lifestyle/indian-wedding-beloved-wife-due-to-sri-lankan-crisis-the-girl-who-came-from-srilanka-on-a-tourist-visa-got-married-to-a-boy-from-up-nrvb-280547.html”]
पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील ७ राज्यात पुढील ५ दिवस जोरदार पूर्वमोसमी पावसाची शक्यता जाणवत असल्याचे माहिती देखील माणिकराव खुळे यांनी दिली. पावसासाठी अनुकूल स्थितीमुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास सुकर झाला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये हे वारे दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागरातील दक्षिणपूर्व भागात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. वाऱ्यांचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटरपर्यंत राहणार असल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, दक्षिण मध्य कर्नाटकावर जमिनीपासून उंच आकाशात ४ ते ५ किमी अंतरापर्यंत असलेल्या चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे अरबी समुद्रावरुन येणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यामुळे पुढील ५ दिवस तामिळनाडू व कर्नाटक किनारपट्टी, केरळ व माही क्षेत्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान पुढच्या दोन दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेशी शक्यता देखील आहे. त्यानंतर हळूहळू ही लाट विरळ होईल.