• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Amravati »
  • Signs Of Summer But The Nights Remain Cold Affecting The Health Of Small Children

Weather Update : उन्हाळ्याची चाहूल; मात्र रात्री थंडी कायम; चिमुकल्यांच्या आरोग्यावर परिणाम

दिवसा कडक ऊन आणि रात्री थंड हवामान याचा थेट परिणाम नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर होत आहे. शाळकरी मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 09, 2026 | 06:27 PM
उन्हाळ्याची चाहूल; मात्र रात्री थंडी कायम; चिमुकल्यांच्या आरोग्यावर परिणाम

उन्हाळ्याची चाहूल; मात्र रात्री थंडी कायम; चिमुकल्यांच्या आरोग्यावर परिणाम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • उन्हाळ्याची चाहूल, मात्र रात्री थंडी कायम
  • दिवस-रात्रीच्या तापमानात मोठी तफावत
  • चिमुकल्यांच्या आरोग्यावर परिणाम
अमरावती: शहरात उन्हाळ्याची चाहूल लागली असली तरी रात्रीची थंडी अजूनही कायम असल्याने दिवस आणि रात्रीच्या तापमानात मोठी तफावत जाणवू लागली आहे. दिवसा कडक ऊन आणि रात्री थंड हवामान याचा थेट परिणाम नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर होत आहे. शाळकरी मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. तसेच हवामानातील सततच्या बदलामुळे टायफॉइडसारख्या गंभीर आजारांची लक्षणेही दिसू लागली आहेत.

मंगळवारपासून (दि. १०) बारावीच्या परीक्षा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत पालकांमध्ये चिंता वाढली आहे. हवामानातील हा बदल विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम करू शकतो, अशीही भावना पालक व्यक्त करीत आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार, रविवारी (दि. ८) जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. पुढील आठ दिवसांत दिवसाचे तापमान हळूहळू वाढून ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते, तसेच रात्रीच्या तापमानात सुमारे ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज आहे.

नाणेकरवाडी–म्हाळुंगे गटात राष्ट्रवादीचा प्रभाव कायम; जिल्हा परिषदेसह पंचायत समितीत संमिश्र निकाल

मात्र, तापमानातील ही तफावत कायम राहणार असल्याने आरोग्यविषयक धोके वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, शहरातील खराब हवेची गुणवत्ता आणि वाढते वायू प्रदूषणही नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. रविवारी वाऱ्याचा वेग ताशी १४ किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, हवेत धूळ आणि कणांचे प्रमाण वाढल्यामुळे श्वसनविकार, सर्दी, खोकला यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. दिवसा कडक ऊन, आकाशात हलके ढग आणि रात्री जाणवणारी थंडी ही स्थिती विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि दीर्घ आजार असलेल्या नागरिकांसाठी अधिक धोकादायक ठरू शकते.

डॉक्टरांचा सल्ला : अशी घ्या आरोग्याची काळजी

लहान मुलांना सकाळी व रात्री गरम कपडे वापरावेत
दिवसा उन्हात बाहेर जाताना टोपी, छत्री व पाणी सोबत ठेवावे
उकळलेले व स्वच्छ पाणीच पिणे आवश्यक
बाहेरील उघड्या ठिकाणचे अन्न टाळावे
ताप, अंगदुखी, उलटी, जुलाब आदी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

हवामानाचा शरीरावर होणारा परिणाम

१) जोरदार वारा, वादळ किंवा थंडीमुळे आरोग्यामध्ये बदल होतो. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्याने, व्यावहारिक दृष्टिकोनातून त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत नाही. परंतु हृदयरोगी, उच्च रक्तदाबाचे रुग्ण आणि मधुमेहींचे आजार अधिक वाढतात आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

२) हिवाळा आणि शरद ऋतूमध्ये पोटाशी संबंधित आजारांची तीव्रता भूक न लागणे, पोट फुगणे, बद्धकोष्ठता, पोटदुखी इत्यादींसारखी असते.

३) जास्त उष्णतेमुळे हृदयावर विपरीत परिणाम होतात. अनेक डॉक्टर पुष्टी करतात की उन्हाळ्यात हृदयविकाराचे झटके येतात. तसेच हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांची तीव्रता वाढते. म्हणून, हृदयरोगाने ग्रस्त असलेल्यांनी किंवा गर्भधारणेदरम्यान काळजी घेणे चांगले.

Indian Railway :- रुळावर येतेय भारतीय रेल्वे : महसुलात ५.१ टक्क्यांची वाढ, आर्थिक स्थिती मजबूत

Web Title: Signs of summer but the nights remain cold affecting the health of small children

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 06:27 PM

Topics:  

  • imd
  • maharashtra
  • Weather Update

संबंधित बातम्या

OTM 2026: जागतिक पर्यटन नकाशावर महाराष्ट्राचा डंका! मुंबईतील ‘ओटीएम’ प्रदर्शनात राज्याच्या दालनाला पर्यटकांची पसंती
1

OTM 2026: जागतिक पर्यटन नकाशावर महाराष्ट्राचा डंका! मुंबईतील ‘ओटीएम’ प्रदर्शनात राज्याच्या दालनाला पर्यटकांची पसंती

Karjat News : कर्जत परिवर्तन आघाडीचा महायुतीला धोबीपछाड, जिल्हा परिषदेचे सर्व सहा जागांवर विजयी..
2

Karjat News : कर्जत परिवर्तन आघाडीचा महायुतीला धोबीपछाड, जिल्हा परिषदेचे सर्व सहा जागांवर विजयी..

Dharashiv : तेर जिल्हा परिषद गटातील निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप; सक्षणा सलगरांची खासदार-आमदारांवर घणाघाती टीका
3

Dharashiv : तेर जिल्हा परिषद गटातील निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप; सक्षणा सलगरांची खासदार-आमदारांवर घणाघाती टीका

Dharashiv Election : धाराशिव जिल्ह्यात निवडणूक निकालांचे चित्र स्पष्ट; तेर व जवळा गटात मोठे उलटफेर
4

Dharashiv Election : धाराशिव जिल्ह्यात निवडणूक निकालांचे चित्र स्पष्ट; तेर व जवळा गटात मोठे उलटफेर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
परीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाची सुरुवात!  शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

परीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाची सुरुवात! शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

Feb 09, 2026 | 07:49 PM
Jio Recharge Plan: 125 रुपयांहून कमी किंमत आणि भरपूर फायदे… हा आहे जिओचा खिशाला परवडणारा प्लॅन, वाचा फायदे

Jio Recharge Plan: 125 रुपयांहून कमी किंमत आणि भरपूर फायदे… हा आहे जिओचा खिशाला परवडणारा प्लॅन, वाचा फायदे

Feb 09, 2026 | 07:48 PM
Ahilyanagar News: संगमनेरमध्ये अवैध्य धंद्यावर धडक कारवाई, 26 लाखांचा मुद्देमाल जप्त

Ahilyanagar News: संगमनेरमध्ये अवैध्य धंद्यावर धडक कारवाई, 26 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 09, 2026 | 07:45 PM
रिटायरमेंटनंतरही अरिजीत सिंग आमिर खानसाठी गाणं गायला तयार? एका फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ

रिटायरमेंटनंतरही अरिजीत सिंग आमिर खानसाठी गाणं गायला तयार? एका फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ

Feb 09, 2026 | 07:40 PM
टफ है बॉस! ITEl ने लॉंच केला ‘मिलिटरी ग्रेड A100 स्‍मार्टफोन’; HD डिस्प्ले अन्…; किंमत फक्त…

टफ है बॉस! ITEl ने लॉंच केला ‘मिलिटरी ग्रेड A100 स्‍मार्टफोन’; HD डिस्प्ले अन्…; किंमत फक्त…

Feb 09, 2026 | 07:35 PM
ZIM vs OMA, ICC T20 World Cup : झिम्बाब्वेचा ओमानवर दिमाखदार विजय! गोलंदाजांसह फलंदाजांनीही दाखवली कमाल 

ZIM vs OMA, ICC T20 World Cup : झिम्बाब्वेचा ओमानवर दिमाखदार विजय! गोलंदाजांसह फलंदाजांनीही दाखवली कमाल 

Feb 09, 2026 | 07:26 PM
Epstein Files चा पडसाद! ब्रिटनचे PM Keir Satrmer यांचे सरकार धोक्यात? ‘या’ कारणांमुळे गमवावे लागणार पद

Epstein Files चा पडसाद! ब्रिटनचे PM Keir Satrmer यांचे सरकार धोक्यात? ‘या’ कारणांमुळे गमवावे लागणार पद

Feb 09, 2026 | 07:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Feb 09, 2026 | 03:43 PM
वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Feb 09, 2026 | 03:40 PM
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.