दिवाळीसाठी कर्मचाऱ्यांना मिळणार ९ दिवस सुट्टी (फोटो- istockphoto)
सगळीकडे पाहायला मिळतोय दिवाळीचा उत्साह
खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी
एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मिळणार ९ दिवस सुट्टी
सध्या सगळीकडे दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. बाजरपेठा सजल्या आहेत. नवीन कपडे, आकाशकंदील घेण्यासाठी, पणत्या खरेदी करण्यासाठी बाजारपेठ फुलली आहे. नागरिकांची गर्दी बाजारात पाहायला मिळत आहे. दरम्यान बाहेरगावी राहणारे सुट्टी घेऊन घरी जाण्यासाठी आतुर आहेत. दरम्यान अशीच एक बातमी समोर आली आहे. एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीची सुट्टी जाहीर केली आहे.
एका कंपनीच्या सीईओने आपल्या कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे दिवाळीची सुट्टी जाहीर केली आहे. कंपनीचे संस्थापक आणि सीईओ यांनी ईमेलद्वारे कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बार कंपनीने एक दोन दिवस नव्हे तर तब्बल ९ दिवसांची सुट्टी कर्मचाऱ्यांना जाहीर केली आहे.
कंपनीचे सीईओ यांनी इमेलमधून कामपासून दूर राहून कुटुंबाला वेळ द्या, असे सांगितले आहे. या इमेलची चर्चा सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिवाळीची ही छान भेट मिळताच आनंद व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी आपल्या भावना सोशल मिडियावर देखील व्यक्त केल्या आहेत.
या कंपनीतील कर्मचाऱ्यांना दिवाळीची तब्बल ९ दिवस सुट्टी मिळणार आहे. जे आपल्या इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गरजा ओळखतात, ज्यांना खरोखर आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी असते , ती काळजी त्यांच्या कृतीतून दिसून येते. कर्मचारी आनंदी असणे ही कंपनीसाठी फायदेशीर असते, अशी एक पोस्ट कर्मचाऱ्याने सोशल मिडियावर पोस्ट केली आहे. त्याने या पोस्टमधून कंपनीच्या सीईओ यांचे देखील आभार मानले आहेत.
कंपनीच्या सीईओंनी आशा प्रकारे सुट्टी जाहीर केल्याने एचआर डिपार्टमेंटला देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. साधारणतः सुट्टी किंवा अन्य कामांची माहिती, सूचना एचआर विभाग देत असते. मात्र या निर्णयामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आता दिवाळी आपल्या कुटुंबासोंबत साजरी करता येणार आहे. तब्बल ९ दिवस त्यांना कामपासून सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
ST Employee: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! राज्य सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार
मुंबई: एसटीच्या सुमारे ८५ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा तसेच वेतन वाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा ६५ कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रीम म्हणून १२ हजार ५०० रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिर केला.