''आता सिंदूर वाटून काहीही मिळणार नाही, लोकांना मूर्ख बनवू नका!''; प्रशांत किशोर यांचा PM मोदींवर हल्लाबोल
“आता युद्धबंदी केलीच आहे, तर लोकांना मूर्ख का बनवलं जात आहे. आता जे काही पसरवलं जात आहे ते चुकीचं आहे. आता कुंकवाच्या करंड्या (सिंदूर) वाटून काहीही होणार नाही, असा टोला जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशात किशोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या केंद्रातील सरकारला लगावला आहे. बिहारमधील पूर्व चंपारण येथे बोलताना प्रशांत किशोर यांनी मोदी सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
Ajit Pawar News: अजित पवारांना धक्का; सात आमदारांनी सोडली साथ
ते पुढे म्हणाले की, जेव्हा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्वतः म्हटले की ही युद्धबंदी पाकिस्तानच्या विनंतीवरून झाली, तेव्हा याचा अर्थ असा होतो की भारत मजबूत स्थितीत होता. इतक्या लवकर युद्धबंदीला सहमती देण्याऐवजी भारत पाकिस्तानवर कारवाई आणखी दोन दिवस चालू ठेवू शकला असता. आता युद्धबंदी झाली आहे, तरीही तुम्ही लोकांना का मूर्ख बनवत आहात! ते तुमच्यासमोर आहेत, ते जे काही बोलत आहेत ते चुकीचे आहे. त्यानंतर, आता सिंदूरच्या पेट्या वाटून काहीही होणार नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.
परराष्ट्र मंत्री एस. यांना प्रश्न विचारताना प्रशातं कुशोर म्हणाले, जयशंकर यांनी स्वतः कबूल केले आहे की युद्धबंदी पाकिस्तानच्या पुढाकाराने झाली आहे. ते सुशिक्षित आणि समजूतदार नेते आहेत. परंतु त्यांच्या निर्णयावर आश्चर्य वाटतं, असंही त्यांनी म्हटलं आहे.
जर पाकिस्तानला युद्धबंदी हवी असेल तर याचा अर्थ असा आहे की सैन्य योग्य काम करत आहे, आम्ही पाकिस्तानला पराभूत करत होतो. तर जर पाकिस्तानला युद्धबंदी हवी असेल तर आम्ही का सहमती दर्शवली? सैन्याने ते आणखी दोन दिवस चालू द्यायला हवे होते. जर पाकिस्तानला युद्धबंदी नको होती, तर ते जे सांगत आहे ते चुकीचे आहे… जेव्हा पाकिस्तान बॅकफूटवर होता आणि तुम्हाला युद्धबंदीची याचना करत होता, तेव्हा तुम्ही युद्धबंदी का जाहीर केली?
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी उडवली पाकिस्तानची झोप; म्हणाले, “ऑपरेशन सिंदूर…”
प्रशांत किशोर यांनी डोनाल्ड ट्रम्पवरही टीका केली. प्रशांत किशोर यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावरही टीका केली आणि म्हटले की त्यांना त्यांच्या शब्दांवर अजिबात विश्वास नाही. ते म्हणाले की डोनाल्ड ट्रम्प भारत-पाकिस्तान युद्धबंदीचे श्रेय घेऊ इच्छित होते… कदाचित त्यांना वाटते की त्यांना यातून शांतता पुरस्कार मिळेल.. पण जेव्हा आपल्या देशाचे परराष्ट्र मंत्री जयशंकर स्वतः युद्धबंदीबद्दल बोलत आहेत… तेव्हा ट्रम्पवर विश्वास ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.