फोटो सौजन्य: iStock
नवी दिल्ली: यंदा भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होण्याचे भारतीयांना आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 च्या स्वातंत्र्य दिनापूर्वी ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट ‘एक्सवर’ वर तिरंग्याचे चित्र लावले आहे.
28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या त्यांच्या मासिक ‘मन की बात’ रेडिओमध्ये, पंतप्रधान मोदींनी हर घर तिरंगा मोहिमेबद्दल बोलले होते आणि लोकांना harghartiranga.com या वेबसाइटवर राष्ट्रध्वजासह सेल्फी अपलोड करण्याचे आवाहन देखील त्यांनी जनतेला केले होते. ही मोहिम 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत राबवण्यात येणार आहे. शुक्रवारी(9 ऑगस्ट) पीएम ने त्यांचा प्रोफाईल डीपी बदलला आणि सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणले की, ‘मी माझे प्रोफाईल पिक्चर बदलत आहे आणि मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की तेच करा. आपला स्वातंत्र्यदिन साजरा तिरंगा साजर करण्यात मला सामील व्हा. आणि 15 ऑगस्ट दिवशी तिरंगासोबत तुमचा सेल्फी harghartiranga.com वर शेअर करा.
हे देखील वाचा – विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केले चक्क पंतप्रधान मोदींचे कौतुक; नेमकं कारण काय?
As this year’s Independence Day approaches, let’s again make #HarGharTiranga a memorable mass movement. I am changing my profile picture and I urge you all to join me in celebrating our Tricolour by doing the same. And yes, do share your selfies on https://t.co/0CtV8SCePz
— Narendra Modi (@narendramodi) August 9, 2024
तिसरी आवृत्ती
हर घर तिरंगा अभियानाची ही तिसरी आवृत्ती आहे. प्रत्येक भारतीयाला राष्ट्रध्वज, तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित करून जनतेमध्ये देशभक्तीची भावना जागृत कऱम्याच्या उद्देशाने ही मोहीम सुरू करण्यात आली होती. 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट च्या कालावधीत हर घर तिरंगा मोहिम राबवली जाते. 2022 पासून सुरू करण्यात आलेल्या अमृत मोहोत्सवाच्या अंतर्गत हर घर तिरंगा मोहिम सुरू करण्यात आली होती.
मोहिमेत कसे सहभागी व्हाल?
प्रत्येक भारतीयाच्या घरावर राष्ट्रध्वज फडकावा या हेतूने ही मोहिम सुरू करण्यात आली होती तुम्हाला या मोहिमेत सहभागी व्हायचे असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर, बाल्कनीत आपला झेंडा तिरंगा लावा. नंतर त्या तिरंग्यासोबत एक सेल्फी काढा. सेल्फी काढून harghartiranga.com वर शेअर करा. तुम्ही तुमच्या देशभक्तीची भावना प्रकट करू शकता. सेल्फी अप्लोड केल्यावर तुम्हाला एक प्रमाणपत्र देखील मिळेल.