(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूडमधील ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित अभिनेत्री जया बच्चन यांचा स्वभाव कडक आणि थेट बोलणारा म्हणून ओळखला जातो. पापाराझींवर चिडणं, त्यांच्या प्रश्नांना टाळणं किंवा थेट सुनावणं, अशा अनेक प्रसंगांचे व्हिडिओ वारंवार सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे अनेकदा त्यांना ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं आहे.
मात्र, या नवरात्रीत जया बच्चन यांचं एक वेगळंच रुप पाहायला मिळालं आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बच्चन कुटुंबाने एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या वेळी जया बच्चन पूर्ण पारंपरिक वेशभूषेत, उपस्थितांना भेटताना दिसल्या.या कार्यक्रमात त्यांनी कोणत्याही पापाराझी किंवा चाहत्यांवर राग न दाखवता, उलट हसत-हसत संवाद साधला, फोटोसाठी पोझ दिली आणि काहींशी प्रेमाने बोलतानाही दिसल्या.
लोकप्रिय गायक पलाश सेन यांनी स्टेजवर मंगळसूत्र घालण्याचा घेतला निर्णय,जाणून घ्या काय आहे खास गोष्ट
जया बच्चन यांनी नवरात्रीनिमित्त काजोल आणि राणी मुखर्जी यांच्या देवीच्या पंडालमध्ये हजेरी लावली. लाल रंगाची साडी नेसून पारंपरिक लूकमध्ये जया बच्चन देवीच्या दर्शनाला गेल्या होत्या. यावेळी त्या पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाल्या, विशेष म्हणजे यावेळीस त्या पापाराझींना ओरडल्या नाहीत तर त्या फोटोसाठी पोझ देताना आणि हसताना दिसल्या. काजोलने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंनी लक्ष वेधले आहे. या फोटोंमध्ये काजोल आणि जया बच्चन या दोघींच्या चेहऱ्यावर गोड हसू दिसत आहे. या फोटोत त्या पारंपारिक वेशभूषेत दिसत आहेत.
या व्हायरल फोटो व्हिडीओ खाली नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्सने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “जयाजी हसत आहेत. म्हणजे हे एआयने केलेले आहे”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “फक्त काजोलच जयाजींना हसवू शकते”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “हे हसणारे चेहरे खूप सुंदर दिसत आहेत”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.