विरोधी पक्षनेते राहुल गांधी (फोटो- ani)
नवी दिल्ली: दिल्लीत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. दिल्ली आणि एनसीआर भागात अनेकांना भटके कुत्रे चावल्याने रेबीज आजाराचा सामना करावा लागला आहे. दरम्यान काळ सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला याबाबत अत्यंत महत्वाचे आदेश दिले आहे. रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना पकडून शेल्टर होममध्ये पाठवण्याचे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला दिले आहेत. या निर्णयावर आता काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील भाष्य केले आहे.
सुप्रीम कोर्टाचा आदेश काय?
रस्त्यावर भटकणाऱ्या कुत्र्यांना पकडून शेल्टर होममध्ये पाठवण्याचे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला दिले आहेत. जर कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. दिल्लीत भटके कुत्रे चावल्याने अनेक नागरिकांना रेबीज झाल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर कोर्टाने या विषयाची गंभीर दखल घेतली आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
सुप्रीम कोर्टाने भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत दिलेल्या निर्णयावर राहुल गांधी यांनी भाष्य केले आहे. सुप्रीम कोर्टाचा भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवण्याचा निर्णय म्हणजे मानवता आणि विज्ञान समर्थित धोरणपासून एक पाऊस मागे आहे. हे मूके प्राणी समस्या नाहीयेत, की ज्यांना दूर केली जाईल. नसबंदी, लसीकरण, सामुदायिक काळजी घेऊन देखील आपण रस्ते सुरक्षित ठेवू शकतो.
The SC’s directive to remove all stray dogs from Delhi-NCR is a step back from decades of humane, science-backed policy.
These voiceless souls are not “problems” to be erased.
Shelters, sterilisation, vaccination & community care can keep streets safe – without cruelty.Blanket…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 12, 2025
एकाच वेळेस रस्त्यावरील सर्व भटक्या कुत्र्यांना शेल्टर होमध्ये पाठवण्याचा हा निर्णय केवळ अमानवीय नव्हे तर, आपली करुणा नष्ट करण्यासारखा आहे. आपण सार्वजनिक सुरक्षितेतसह प्राण्यांची काळजी देखील घेऊ शकतो.
कोर्टात काय घडले?
ज्या नागरिकांना रेबीज झाला त्यांना परत आणता येईल का? असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारला. भटक्या कुत्र्यांमुळे जखमी होणाऱ्यांच्या घटनेत वाढ झाल्याने सुप्रीम कोर्टाने याबाबतचे आदेश दिल्ली राज्य सरकारला दिले आहेत. त्वरित या सर्व भटक्या कुत्र्यांना पडकून शेल्टर होममध्ये पाठवावे, असे या आदेशात म्हटले आहे. जवळपास ५००० कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवण्याची आवश्यकता असल्याचे कोर्ट म्हणाले.
सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकार आणि एनडीएमसीला लवकरात लवकर भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या आदेशाची पायमल्ली जाणाऱ्या म्हणजेच, या कारवाईत कोणी अडथळा आणल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.