फोटो सौजन्य: Yandex
“दूध मांगोगे तो खीर देंगे लेकीन कश्मीर मांगोगे तो चीर देंगे” या वाक्याचं कारण म्हणजे भारत पाकीस्तान सीमावाद. कश्मीर, ज्याला भारताचं नंदनवन म्हटलं जातं. असं म्हणतात मेल्यावर स्वर्ग दृष्टीस पडतो मात्र जीवंतपणी अनुभवायला मिळणारा स्वर्ग म्हणजे कश्मीर. मात्र या मन वेधून घेणाऱ्या सौंदर्याला श्राप आहे, ग्रहण लागलंय ते दशवादी संघटनेचं. सीमाभागात आणि पाकव्याप्त काश्मीर भागात असलेले दशवाद्याचं तळ आणि सतत होणारे घातपात यामुळे या स्वर्गाचा दिवसेंदिवस नरक होत चालला आहे. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे पहलगाम येथील दहशतवादी हल्ला. असे कित्येक हल्ले हे सीमाभागात होत असातात. कधी ते समोर येतात तर कधी येत नाही.
पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याच्या देशातील प्रत्येक नागरिकाकडून तीव्र निषेध केला जात आहे. काश्मीरच्या सीमाभागात कायमच दहशतवाद्यांकडून कुरघोड्या केल्या जातात. या दहशतवाद्यांचं सगळ्यात मोक्याचं ठिकाण म्हणजे पाकव्याप्त कश्मीर. हे पाकव्यप्त कश्मीर प्रकरण नेमकं आहे तरी काय हे जाणून घेऊयात.
फाळणीच्या आधीपासून काश्मीरमध्ये महाराज हरी सिंग यांचं राज्य होतं. जम्मू आणि काश्मीरमध्ये सत्ता असलेले ते शेवटचे राजे होते. 1947 मध्ये भारत पाकिस्तानची फाळणी झाली. यावेळी काश्मीरचा प्रश्न गंभीर होता. त्यावेळी महाराज हरी सिंग हे काश्मीरचे राज्यकर्ते असल्याने त्यांच्यासमोर दोन पर्याय होते. भारतात सामील होण्याचा किंवा पाकिस्तानमध्ये सामील होण्याचा. मात्र हरी सिंग यांना दोन्ही पर्याय मान्य नव्हते. त्यांना काश्मीर स्वतंत्र राष्ट्र म्हणून हवं होतं. मात्र योग्य तो निर्णय घेण्यासाठी हरी सिंग यांना बराच वेळ लागला. पाकीस्तान आणि भारताच्या सीमाभागातील काही मुस्लीम लोकांनी हरी सिंग यांच्या विरोधात संघटना उभी केली. ही संघटना हळू हळू बळकट होऊ लागली. त्यानंतर हरी सिंग यांना आपलं राज्य धोक्यात असल्याचं कळून चुकलं.
या सगळ्या घटनेनंतर, हरी सिंग यांनी भारतीय लष्कराकडे मदत मागितली. भारत सरकारने देखील हरी सिंग यांनी मदत करण्याचा शब्द दिला. मात्र यावेळी भारत सरकारने हरी सिंग यांच्यासमोर काही अटी ठेवल्या होत्या. त्या अटी अशा होत्या की, भारतीय लष्कर हरी सिंग यांना मदत करेन. मात्र हरी सिंग यांनी घोषित करावं की जम्मू आणि काश्मीर हे भारतात अविभाज्य हिस्सा आहे. भारतीय दळणवळणासाठी काश्मीर आणि जम्मू हे महत्त्वाचे आहेत. भारत सरकारची ही अट मान्य करण्याशिवाय हरी सिंग यांच्याकडे पर्याय नव्हता. हरी सिंग यांनी भारत सरकारची अट मान्य केली. मात्र हा निर्णय घेई पर्यंत हरी सिंग यांना उशिर झाला होता. दरम्यानच्या त्या काळात ज्या मुस्लीम संघटना बळकट होत गेली त्या संघटनेने कश्मीरचा काही भाग बळकवला. हा तोच भाग आहे जो आता POK म्हणजे पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जातो.
हा पाकव्याप्त कश्मीर भारतात पुन्हा यावा यासाठी लष्कराकडून शक्य तो सगळे प्रयत्न आजवर होत आहे. या पाकव्याप्त कश्मीर परिसरात मोठ्या प्रमाणात पारीस्तानी लष्कर दहशतवाद्यांना पोसत असतात. कश्मीरचा हा भाग पुन्हा भारतात परत येईल का ? आता तरी सरकार यावर ठोस पाऊलं उचलणार का ? हे येणाऱ्या काही काळात स्पष्ट होईल.