अयोध्या येथील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी (Photo Credit : Social media)
बीड : उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी पाकिस्तानातून दिली गेल्याचे समोर आले आहे. बीड जिल्ह्यातील शिरूर कासार भागात राहणाऱ्या एका तरुणाला सोशल मीडियावर एक मेसेज आला, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली होती. मेसेज पाठवणारा व्यक्ती स्वतःला कराची, पाकिस्तानचा असल्याचा दावा करत आहे. आरोपीने तरुणाला त्याचे लोकेशनही पाठवले आहे. जेणेकरून तो खरोखरच पाकिस्तानचा असल्याचे सिद्ध करू शकेल. इतकेच नाही तर जर तरुण या कटात सामील झाला तर त्याला एक लाख रुपयांचे बक्षीस मिळेल, असेही त्याने सांगितले. या कामगिरीसाठी एक लाख रुपये आणि 50 लोकांची गरज असल्याचेही त्याने मेसेजमध्ये सांगितले.
मेसेज पाठवणाऱ्या संशयिताने सांगितले की, हे काम करण्यासाठी ५० लोकांची आवश्यकता आहे. प्रत्येकाला एक लाख रुपये दिले जातील. तसेच मंदिर उडवून देण्यासाठी आरडीएक्स देखील उपलब्ध करून दिले जाईल. तरुणांना पाठवलेल्या मेसेज आणि ऑडिओ क्लिपमध्ये हे सर्व सांगितले आहे. आता याप्रकरणी पोलिसांसह तपास यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.
राम मंदिराचे बांधकाम सुमारे सहा महिन्यांपूर्वी सुरू झाले होते. मंदिराचा मुख्य भाग पूर्ण झाला आहे. मंदिराच्या परिसरात सत्संग स्टेज, सीमाभिंत आणि इतर आवश्यक सुविधांचे बांधकाम वेगाने सुरू आहे. हे मंदिर उभारण्यासाठी हिंदू समाज मोठ्या प्रमाणावर मदत करत आहे. कोणी विटा देत आहे, कोणी सिमेंट पुरवत आहे, तर काही स्वतःच्या मेहनतीने मजुरी करत आहेत. असे या मंदिराचे वैशिष्ट दिसत आहे. या मंदिरात केवळ भारतातीलच नाहीतर परदेशातील भक्तही भक्तिभावाने येताना पाहिला मिळत आहे.