माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्याबाबत थेट राष्ट्रपतींकडे तक्रार; निवृत्त न्यायाधीशांनी केला 'हा' आरोप (फोटो-सोशल मीडिया)
नवी दिल्ली : देशाचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्याविरुद्ध सीबीआय चौकशीची मागणी करणारी एक तक्रारच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे करण्यात आली. यातील तक्रारदार हे पाटणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश राकेश कुमार आहेत. तक्रारदार यांनी यामध्ये आरोप केला की, माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सुनावणीसाठी खटला सूचीबद्ध करण्यात कथितपणे सक्रियता दाखवली होती.
तक्रारीत म्हटले आहे की, 1 जुलै 2023 रोजी सुट्टी होती. सुट्टीनंतर सर्वोच्च न्यायालय सोमवार 3 जुलै 2023 रोजी नियमितपणे सुरु होणार होते. पण, 1 जुलै रोजीच सुट्टीच्या दिवशी तत्कालीन सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सीतलवाड यांच्या जामीन अर्जावर पहिल्या दिवशी सुनावणी करण्यासाठी विशेष खंडपीठ स्थापन केल्याचा आरोप आहे. पण, कोणत्याही प्रकरणाची सुनावणी कधी आणि कोणत्या खंडपीठासमोर करायची हे ठरवण्याचा अधिकार फक्त मुख्य न्यायाधीशांनाच आहे.
सरन्यायाधीश हे ‘मास्टर ऑफ रोस्टर’ असतात आणि कोणत्याही खटल्याच्या सुनावणीची निकड लक्षात घेऊन ते एक खंडपीठ स्थापन करतात आणि अनेक वेळा सुट्टीच्या दिवशीही तातडीच्या खटल्यांची सुनावणी झाली आहे.
न्यायमूर्ती चंद्रचूड 10 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त
न्यायमूर्ती राकेश कुमार यांनी 8 नोव्हेंबर 2024 रोजी राष्ट्रपतींना तक्रार पत्र पाठवले होते. तर न्या. चंद्रचूड हे 10 नोव्हेंबर 2024 रोजी सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाले. न्यायमूर्ती कुमार यांनी राष्ट्रपतींना तक्रार पाठवण्याची आणि सीबीआयकडून प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मान्य केली.
राष्ट्रपतींना पाठवलेले हे पत्र कायदा मंत्रालयापर्यंत पोहोचले
न्यायमूर्ती कुमार यांनी पत्रात म्हटले आहे की, ते विशेष खंडपीठाने त्यांच्या अधिकारांचा वापर करून दिलेल्या आदेशावर कोणताही प्रश्न नाही. मात्र, फक्त विशेष खंडपीठ तयार करताना दाखवलेल्या अतिक्रियाशीलतेबद्दल हा प्रश्न आहे. राष्ट्रपतींना पाठवलेले हे पत्र कायदा मंत्रालयापर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.