दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांनी एक अतिशय कठीण अशी शस्त्रक्रीया पार पाडली.
दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांनी एक अतिशय कठीण अशा शस्त्रक्रीयेत 14 वर्षांच्या मुलाच्या पोटातून तब्बल 65 धोकादायक वस्तू बाहेर काढल्या. तब्बल पाच तास चाललेल्या या शस्त्रक्रीयेतून मुलाच्या पोटातून बाहरे काढण्यात आलेल्या वस्तूंमध्ये बॅटरी, चेन, रेझर ब्लेडचे तुकडे आणि स्क्रूसारख्या वस्तू होत्या. मात्र मुलाला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलं आहे.
हेही वाचा-Breaking तिरोडा रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात; रेल्वेखाली येऊन प्रवाशांचा मृत्यू
उत्तर प्रदेशच्या हातरसमधील १४ वर्षीय आदित्य शर्मा याच्या पोटात दुखत असल्यामुळे दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात जाखल करण्यात आलं होतं..” त्याचे वडील आणि औषध प्रतिनिधी असलेल्या साचेत शर्मा यांनी सांगितलं की, आदित्यला १३ ऑक्टोबर रोजी श्वास घेताना त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्याला आग्रातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखवण्याचा सल्ला दिला. मुलाच्या आजाराचं योग्य निदान होईल या आशेने पुढचे दोन आठवडे त्यांनी जयपूर, अलीगढ, नोएडा आणि दिल्ली अशा चार शहरांमधील नामांकीत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र, आदित्यला वाचवता आलं नाही.
हेही वाचा-Sameer Khan : नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन, अपघातात झाले होते जखमी
ही सर्व घटना एक महिन्यात घडली. त्याला पूर्वी कोणतीही शारीरिक किंवा मानसिक समस्या नव्हती. आदित्य हा शर्मा यांचा एकटा मुलगा होता. आग्रातील रुग्णालयात गेल्यानंतर आदित्यला जयपूरच्या रुग्णालयात पाठवण्यात आले, जिथे स्कॅनिंग आणि चाचण्या केल्यानंतर ते १९ ऑक्टोबर रोजी यूपीमध्ये परतले. दोन दिवसांनंतर आदित्यला श्वास घेण्यात पुन्हा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्याला त्याच्या अलिगढच्या रुग्णालयात दाखलं करण्यात आलं. तिथे सीटी स्कॅनमध्ये नासिकेमध्ये समस्या असल्याचं निदान झालं, त्यावर यशस्वी उपचारही करण्यात आले.
मात्र त्यानंतर आदित्यला पुन्हा पोटदुखी सुरू झाली. २६ ऑक्टोबर रोजी अलीगढमध्ये अल्ट्रासाउंड चाचणीमध्ये १९ वस्तू पोटात अडकल्याचं आढळून आलं. तिथेच त्याला तातडीने नोएडाच्या एका खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले. नोएडामध्ये डॉक्टरांनी पोटात ४२ वस्तू आढळल्याचं सांगितले आणि तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचे सांगितलं. आदित्यला नंतर दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आलं, जिथे स्कॅनिंगमध्ये त्याच्या पोटात एकूण ६५ वस्तू आढळल्या होत्या. आदित्यच्या हृदयाचा ठोका २८० प्रति मिनिटांपर्यंत वाढला होता. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही आदित्य मृत्यू झाला आहे.