मुंबई : बॉलिवूड अभिनेता-कॉमेडियन सुनील ग्रोव्हर त्याच्या हृदयावरील शस्त्रक्रियेमुळे चर्चेत आहे. त्याच्याबद्दल माहिती होताच त्याचे
चाहते तो लवकरात लवकर बरा व्हावा म्हणून प्रार्थना करत आहेत. बॉलीवुडचा भाऊ म्हणजेच सलमान खान देखील सुनील ग्रोव्हरच्या मदतीसाठी पुढे आला आहे. रिपोर्ट्सनुसार, सलमान खान स्वतः सुनीलची काळजी घेत आहे.
सलमानच्या डॅाक्टरांच एक टीमचं सुनीलवर लक्ष
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, स्वत: सलमान खाननेही सुनीलच्या हृदय शस्त्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवले होते. याशिवाय सुनील ग्रोव्हरला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असतानाही सलमान खान सुनीलसोबत ऑन कॉल होता. आता सुनीलला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. यानंतरही सलमानने त्याच्या डॉक्टरांच्या टीमला सुनीलच्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे.
[read_also content=”उतारवयात ‘या’ स्टार्सची झाली अशी अवस्था; कोणी रस्त्यावर तर कोणी मनोरुग्णालयात आढळले https://www.navarashtra.com/latest-news/bollywood/these-stars-were-found-on-the-street-and-some-in-a-psychiatric-hospital-nrak-232871.html”]
सुनील ग्रोवरची अचानक हृदय शस्त्रक्रिया झाल्याची बातमी ऐकून अनेक बॉलिवूड स्टार्सना धक्का बसला. यापैकी एक म्हणजे कॉमेडियन कपिल शर्मा. कपिलने टाईम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना सांगितले की, ‘जेव्हा मला सुनीलच्या हृदयाच्या शस्त्रक्रियेबद्दल कळाले तेव्हा मला धक्काच बसला. मला सुनीलच्या तब्येतीची काळजी आहे आणि मी त्याला मेसेजही पाठवला आहे. मात्र त्यांना नुकतेच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, त्यामुळे त्यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तो आता विश्रांती घेत आहे. ‘सुनील माझ्या मेसेजला उत्तर देईल अशी अपेक्षाही मी करत नाही. कारण यावेळी त्यांना विश्रांतीची गरज असते. अगदी लहान वयातच त्यांची बायपास सर्जरी झाली होती. पण तो लवकरच बरा होईल’.
एका वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान सुनीलला हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर रुग्णालयात तपासणी दरम्यान सुनीलच्या हृदयात मोठा ब्लॉकेज असल्याचे आढळून आले. त्यानंतर डॉक्टरांनी सुनीलवर बायपास सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. सध्या सुनीलला शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून लवकरच तो पूर्ण बरा होण्याची अपेक्षा आहे.
[read_also content=”हॉलिवुडच्या ॲक्शनपटात प्रियंका चोप्राची एन्ट्री, ‘एंडिंग थिंग्स’मध्ये अभिनेता अँथनी मैकी सोबत स्क्रीन शेयर करणार https://www.navarashtra.com/movies/priyanka-chopra-will-share-screen-with-anthony-mackie-in-ending-things-movie-nrps-232961.html”]