काँग्रेसच्या मुख्यालयाचा 'हा' असणार नवीन पत्ता, काय आहे 'इंदिरा गांधी' भवन? (फोटो सौजन्य-X)
New Congress Headquarters News Marathi : काँग्रेस खासदार सोनिया गांधी यांनी दिल्लीतील नवीन पक्ष मुख्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि रायबरेलीचे खासदार राहुल गांधी देखील उपस्थित होते. याचदरम्यान उद्घाटनाबरोबरच काँग्रेसच्या नवीन मुख्यालयाबाबतही वाद सुरू झाला आहे. त्याचे नाव ‘इंदिरा भवन’ वरून ‘सरदार मनमोहन सिंग भवन’ करण्याची मागणी होत आहे. पक्ष कार्यालयाबाहेर यासंबंधीचे एक पोस्टर लावण्यात आले आहे.
काँग्रेसचे जुने मुख्यालय लुटियन्स बंगला झोनमधील २४ अकबर रोड येथे होते. पण आता काँग्रेस मुख्यालयाचे नवीन पत्ता कोटला रोडवरील 9-ए इंदिरा गांधी भवन असे झाले आहे. नवीन इमारतीची पायाभरणी सोनिया गांधी यांनी २८ डिसेंबर २००९ रोजी केली होती. काँग्रेसचे नवीन मुख्यालय अनेक आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. इमारतीच्या अगदी मध्यभागी स्वागत कक्ष बांधला आहे. तळमजल्यावर, डावीकडे, हाय-टेक पत्रकार परिषद कक्ष आहे. काँग्रेसच्या मीडिया प्रभारींचे कार्यालयही याच बाजूला असेल.
कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge, CPP चेयरपर्सन श्रीमती सोनिया गांधी जी और नेता विपक्ष श्री @RahulGandhi ने कांग्रेस के नए मुख्यालय ‘इंदिरा भवन’ का उद्घाटन किया।
कांग्रेस का नया मुख्यालय देश में सेवा, सौहार्द, कर्तव्यनिष्ठा और राष्ट्रप्रेम का प्रतीक है।
📍 नई दिल्ली pic.twitter.com/dBwTwOIz8G
— Congress (@INCIndia) January 15, 2025
कार्यक्रमांसाठी पहिल्या मजल्यावर हाय-टेक ऑडिटोरियम बांधण्यात आले आहेत. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अधिकाऱ्यांची कार्यालये असतील. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालये असतील. कॅन्टीनचा परिसर रिसेप्शनच्या अगदी मागे आहे. शेतकरी विभाग आणि डेटा विभागासाठी स्वतंत्र खोल्या असतील. टीव्हीवरील वादविवादांमध्ये सहभागी होणाऱ्या प्रवक्त्यांसाठी छोटे ध्वनीरोधक कक्ष बांधण्यात आले आहेत. याच्या शेजारीच पत्रकार आणि कॅमेरामनसाठी बैठकीच्या खोल्याही बनवण्यात आल्या आहेत. नवीन मुख्यालयात अनेक जुन्या पक्ष नेत्यांचे फोटो देखील लावले आहेत. त्यापैकी अनेकांनी आधीच पक्ष सोडला आहे. यामागे प्रियंका गांधी यांचा मेंदू असल्याचे म्हटले जाते.
सर्वोच्च न्यायालयाने एका आदेशात लुटियन्स झोनमधून राजकीय पक्षांची कार्यालये हटवण्यास सांगितले होते. यानंतर, २००५-०६ मध्ये, केंद्र सरकारने आयटीओ चौक आणि कॅनॉट प्लेसला जोडणाऱ्या दीनदयाळ उपाध्याय मार्गाजवळ राजकीय पक्षांना कार्यालयीन भूखंड देण्याची प्रक्रिया सुरू केली. भाजप आणि आम आदमी पक्षाची कार्यालयेही नवीन काँग्रेस मुख्यालयापासून थोड्या अंतरावर आहेत. दिल्ली काँग्रेसचे कार्यालय दीनदयाळ उपाध्याय मार्गावरही आहे. दिल्ली भाजप कार्यालयही लवकरच येथे स्थलांतरित होईल.