दिल्ली : भारतीय हवामान खात्यानुसार, एप्रिलपासून उत्तर आणि मध्य भारतात तापमानात झपाट्याने वाढ होईल. कडक उन्हाचा तडाखा आणि उष्ण वाऱ्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. पर्वतीय आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये हवामानात बदल दिसून येईल. देशाच्या पूर्वेकडील राज्यांमध्येही पावसामुळे तापमानात घट होईल. महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या परिसरात चक्रीवादळाचे क्षेत्र तयार होत असून त्याचा प्रभाव राजस्थान आणि मध्य प्रदेशपर्यंत दिसून येईल. यादरम्यान वायव्य राजस्थान आणि लगतच्या भागात हवेत आर्द्रता असेल. दिल्लीतही तापमान वाढणार आहे. तर ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे(Scorching heat and hot winds; Hit wave warning in favorite tourist destinations including Maharashtra, Arunachal Pradesh, Assam, Delhi, Rajasthan).
हवामान विभागाने यावर्षी भारतातील विविध भागांमध्ये उन्हाळा लांबण्याची शक्यता वर्तवली आहे. कारण भारतातील बहुतांश भागांमध्ये मार्चच्या मध्यापासून कडक सूर्यप्रकाशामुळे तापमानात वाढ होत आहे. आयएमडीनुसार 29 मार्चपर्यंत अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, सिक्कीम, उप-हिमालयी बंगाल, ओडिशा येथे हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. तसेच पुढील दोन दिवस संपूर्ण ईशान्य प्रदेशात ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
हवामान विभागानुसार राजस्थान व्यतिरिक्त उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. झारखंडमध्येही हवामान कोरडे राहील आणि उष्णतेची लाट राहील. पुढील 24 तासांत केरळ, कर्नाटक, तामिळनाडूच्या काही भागात तुरळक पाऊस पडू शकतो.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]