हॉटेलमध्ये एकाच वेळी केले जात होते 500 लोकांचे धर्मांतर; धक्कादायक प्रकार आला समोर

राजस्थानमधील भरतपूरमध्ये एका हॉटेलमध्ये धर्मांतर केले जात होते. एकाच वेळी तब्बल 500 लोकांचे धर्मांतर करत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

    भरतपूर : राजस्थानमधील (Rajasthan) धर्मांतराचा (conversion) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजस्थानमधील भरतपूरमध्ये (Bharatpur) एका हॉटेलमध्ये धर्मांतर केले जात होते. एकाच वेळी तब्बल 500 लोकांचे धर्मांतर करत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकराची खबर विश्व हिंदू परिषदेच्या (Vishwa Hindu Parishad) कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत हा प्रकार उघडकीस आणला आहे.

    तब्बल 500 लोकांचे एकत्र धर्मांतर करण्याचा हा प्रकार भरतपूरमधील अटल बंद ठाण्याच्या परिसरात घडला. यावेळी एका हॉटेलमध्ये सर्व लोकांना बोलावून त्यांचे वेगळ्या धर्मामध्ये परिवर्तन केले जात होते. याचा सुगावा लागताच विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्ते हॉटेलमध्ये दाखल झाले. या कार्यकर्त्यांमध्ये आणि धर्मांतर कार्यक्रम आयोजकांमध्ये जोरदार वाद झाला. यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी पोलीस आल्यानंतर हॉटेलमध्ये जमलेल्या काही लोकांनी पळ देखील काढला.

    विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की, ख्रिश्चन धर्माच्या लोकांकडून सत्संगाच्या माध्यमातून धर्मांतर केलं जाणार होतं. यामध्ये पाचशेपेक्षा जास्त महिला आणि तरुणींचा समावेश होता. विश्व हिंदू परिषेदेचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये पोहोचताच मोठा गोंधळ उडाला. जे लोक धर्मांतर करणार होते हे हॉटेलमध्ये पळ काढू लागले. यावेळी कार्यकर्त्यांनी जवळपास 10 जणांना पकडलं. त्यामुळे कार्यक्रमाचे आयोजक आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. अगदी प्रकरण मारहाणीपर्यंत झाली. काही काळ हॉटेल परिसरामध्ये मोठा गदरोळ झाला होता. पोलीस अश्रूधुरांच्या नळकांड्या घेऊन घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाचपेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. शिवाय पाच ते सात महिला आणि तरुणींनाही अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार तब्बल 20 ठिकाणांवर असंच धर्मपरिवर्त केलं जात आहे.