लातूर तालुक्यातील खंडापूर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण उत्सवादरम्यान जमा झालेल्या देणगी रकमेत कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याप्रकरणी मुख्य आयोजक किशोर धोंडीराम जाधव ऊर्फ शिवणीकर, त्याचा सहकारी सोनवणे आणि इतर काही साथीदारांविरुद्ध लातूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात आज दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३(५), ३१६(२), ३१८(४) आणि ३५१(४) अन्वये हा गुन्हा नोंदविण्यात आला असून, तक्रारदार श्याम भारत बरुरे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली. तक्रारीनुसार, २२ फेब्रुवारी ते ०२ मार्च २०२६ दरम्यान खंडापूर येथे आयोजित धार्मिक उत्सवासाठी मराठवाड्यातील विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर देणगी संकलित करण्यात आली होती. उत्सवानंतर उर्वरित निधी देहू येथील भंडारा डोंगरावर संत तुकाराम महाराज मंदिर बांधकामासाठी वापरण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल्याचा दावा फिर्यादीने केला. मात्र यासाठी कोणताही अधिकृत ट्रस्ट नोंदणीकृत नसताना सुमारे साडेतीन हजार पावती पुस्तिकांच्या माध्यमातून देणगी संकलित करण्यात आली. या माध्यमातून सुमारे पाच कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांहून अधिक निधी जमा झाल्याचा दावा करण्यात आला असून, त्यातील सुमारे तीन कोटी पासष्ट लाख रुपयांचा हिशोब उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.