नवी दिल्ली : देशाला लवकरच आणखी नव्या काही बँका मिळू शकतात. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अनेक लघु वित्त बँकांकडून या संदर्भात अर्ज मागवलेत. जर कोणतीही समस्या आढळली नाही तर त्यांना आरबीआयद्वारे नियमित किंवा सार्वत्रिक बँकांचा दर्जा दिला जाऊ शकतो.
सध्या देशात सुमारे डझनभर लघु वित्त बँका आहेत. यामध्ये एयू स्मॉल फायनान्स बँक, इक्विटास स्मॉल फायनान्सmation बँक आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक यासह सुमारे डझनभर लघुवित्त बँकांचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर 2014 मध्ये खाजगी क्षेत्रातील लघु वित्त बँकांच्या परवान्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. मात्र, तत्कालीन लघुवित्त बँकांचा व्यवसाय पसारा वाढत असल्याने रिझर्व्ह बँकेने हे पाऊल उचलले आहे.
बँक बनण्यासाठी लघुवित्त बँकेला मागील तिमाहीच्या अखेर (ऑडिट केलेले) किमान निव्वळ 1,000 कोटींची संपत्ती असणे आवश्यक आहे आणि बँकेचे समभाग मान्यताप्राप्त बाजारमंचावर सूचिबद्ध केलेले असावेत, असे मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे.
डिसेंबर 2019 मध्ये, रिझर्व्ह बँकनेलघु वित्त बँकांना नियमित अथवा सार्वत्रिक बँकांमध्ये रूपांतरित होण्याचा मार्ग प्रदान केला. मागील दोन आर्थिक वर्षांमध्ये त्याचा निव्वळ नफा आणि एकूण बुडीत कर्ज आणि निव्वळ बुडीत कर्ज अनुक्रमे 3 टक्के आणि 1 टक्क्यांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.