नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (mallikarjun kharge,) आणि सोनिया गांधी (sonia gandhi) यांनी पंडित नेहरूंना (jawaharlal nehru ) श्रद्धांजली वाहिली. दोन्ही नेत्यांनी नेहरूंच्या समाधी शांती वन येथे पोहोचून त्यांना पुष्प अर्पण केले.
आज देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची जयंती देशभरात साजरी करण्यात येत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. दोन्ही नेत्यांनी नवी दिल्लीतील शांती वन या नेहरूंच्या समाधीस्थळी पोहोचून त्यांना पुष्प अर्पण केले. ‘भारताच्या विकासातील योगदानाबद्दल देश पंडित जवाहरलाल नेहरूजींना आठवत आहे.” असं ट्विट करत काँग्रेसच्या वतीने ट्विट करण्यात आलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पंडित नेहरूंना आदरांजली वाहिली. मोदींनी ट्विट करत म्हण्टलं की, आमचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम. त्यांनी देशासाठी दिलेले योगदान देशाला कायम स्मरणात राहणार.
याशिवाय काँग्रेस पक्षाकडून पंडित नेहरूंचा एक व्हिडिओही ट्विट करण्यात आलं आहे. ‘मुले ही बागेतील उमललेल्या कळीसारखी असतात, जिला मोठ्या प्रेमाने आणि हळुवारपणे वाढवले पाहिजे. काही देशाचे पहिले पंतप्रधान पंडित श्री जवाहरलाल नेहरू किंवा मुलांचे ‘अंकल नेहरू’ सारखे होते.
“बच्चे बागों में खिली उस कली की तरह होते हैं…जिनकी परवरिश बहुत प्यार और नरमी से करनी चाहिए”
कुछ ऐसे थे देश के प्रथम प्रधानमंत्री पंडित श्री जवाहरलाल नेहरू या यूं कहें बच्चों के ‘चाचा नेहरू’#BharatJodoYatra pic.twitter.com/2OjevckKcM
— Congress (@INCIndia) November 14, 2022