डिंपल यादव यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या मौलानाला दिला चोप, VIDEO व्हायरल
समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांच्या वेशभूषेवर मौलाना साजिद रशिदी यांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यावरून आज एका लाईव्ह चर्चा सत्रात प्रेक्षक आणि पॅनलमधील काही सदस्यांनी मौलानाला चोप दिला आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
दम असेल तर डोनाल्ड ट्रम्प यांना खोटं ठरवा; राहुल गांधींचं PM मोदींना ओपन चॅलेंज
सपा खासदार डिंपल यादव यांच्या पोशाखावर आक्षेपार्ह टिप्पणी करणारे मौलाना साजिद रशिदी यांना एका टीव्ही न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये जोरदार विरोध सहन करावा लागला. चर्चेदरम्यान उपस्थित असलेल्या काही लोकांनी त्यांना घेरले आणि मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.काही दिवसांपूर्वी डिंपल यादव यांनी मशिदीला भेट दिली होती, त्यावेळी त्यांनी त्यांचं डोकं झाकलेलं नव्हतं. यावरून मौलाना साजिद रशिदी यांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं.
SP workers beat up Maulana Rashid, who commented on SP MP Dimple Yadav, at a news channel in Noida.
— Sanjay Deka (@thefljournalist) July 29, 2025
मौलानांच्या विधानावर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. एनडीए खासदारांनी संसदेच्या परिसरात मौलानांच्या विरोधात निदर्शने केली, तर डिंपल यादव यांनीही हे विधान “घृणास्पद आणि अपमानजनक असल्याचं म्हटलं आहे.या घटनेनंतर मौलानांविरुद्ध एफआयआर देखील दाखल करण्यात आला. या विधानामुळे केवळ महिलांचा अपमान झाला नाही तर देशाच्या संस्कृतीलाही धक्का बसला आहे, असं मत काहींनी व्यक्त केलं.
मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की, वादविवादादरम्यान काही लोक मौलानांच्या विधानाला विरोध करत संतप्त झाले आणि त्यांना मारहाण केली. या घटनेवर चॅनेलने स्पष्टीकरण दिलं आहे.
प्रकरण काय आहे?
मौलाना साजिद रशिदी यांनी सपा खासदार डिंपल यादव यांच्या मशिदीला भेट दिल्यानंतर त्यांच्या पोशाखाबद्दल वादग्रस्त आणि आक्षेपार्ह विधान केले होते. ते म्हणाले होते की, “डिंपल यादव डोकं न झाकता मशिदीत गेल्या, त्यांची मान आणि पाठ उघडी दिसत होती. जर एखादी मुस्लिम महिला अशा प्रकारे गेली असती तर तिला परवानगी दिली नसती.” असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानानंतर अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. पोलिसात त्यांच्याविरोधात एफआयआर देखील दाखल करण्यात आला आहे.