सुदर्शन रेड्डी यांची मोर्चेबांधणी; उत्तर प्रदेशात जाऊन घेतली अखिलेश यादव यांची भेट (फोटो - सोशल मीडिया)
नवी दिल्ली : येत्या दिवसांत उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेतली जाणार आहे. त्यात इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी मोर्चेबांधणी केली आहे. त्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतली. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाल्याची माहिती समोर आली आहे.
या भेटीवर बोलताना ते म्हणाले की, ‘ही निवडणूक पराभव किंवा विजयाची नाही तर तत्वांची आहे. रेड्डी यांनी भाजपवर विचारसरणीच्या आधारावर निवडणूक विभागल्याचा आरोप केला. न्यायाच्या बाजूने असलेले लोक त्यांच्या विवेकाच्या आवाजावर मतदान करतील. तसेच सुदर्शन रेड्डी यांनी सांगितले की, ते उत्तर प्रदेशातील निवडून आलेल्या नेत्यांचा पाठिंबा घेण्यासाठी आले आहेत. अखिलेश यादव यांच्याशिवाय हे सर्व शक्य नव्हते.
Vice President Election : सुदर्शन रेड्डी यांची मोर्चेबांधणी; उत्तर प्रदेशात जाऊन घेतली अखिलेश यादव यांची भेट
ते म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत ‘जस्टिस फॉर द इलेक्शन’पेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही. दरम्यान, रेड्डी यांनी दिल्लीत अरविंद केजरीवाल आणि चेन्नईत स्टॅलिन यांचीही भेट घेतली आहे.
भाजपवर साधला निशाणा
सुदर्शन रेड्डी यांनी भाजपवर विचारसरणीच्या आधारावर ही निवडणूक विभागल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, हा पराभव किंवा विजयाचा प्रश्न नाही, तर तत्वांचा प्रश्न आहे. न्यायाच्या बाजूने असलेले लोक त्यांच्या विवेकाचा आवाज ऐकतील आणि त्यांच्या बाजूने मतदान करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या निवडणुकीसाठी एकमताने मला उमेदवारी देण्यात आली आहे.
पाठिंबा मिळविण्यासाठी मोहीम
रेड्डी म्हणाले की, त्यांनी दिल्लीत केजरीवाल आणि चेन्नईत स्टॅलिन यांची भेट घेतली आहे. अनेक खासदारांशी ते बातचीत करत आहेत. अखिलेश यादव यांनीही याला राजकीय मुद्दा म्हटले नाही, तर त्यांना एकमताने उमेदवार बनवण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील नेत्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ते लखनौ येथे गेल्याचे समोर आले आहे. त्यांना चांगला पाठिंबाही मिळत आहे.
हेदेखील वाचा : Maratha Reservation : मराठा आंदोलनाला हाय कोर्टाचा लगाम; तरीही मनोज जरांगे पाटील मुंबईत येण्यावर ठाम