West Bengal SIR: पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाचा 'सर्जिकल स्ट्राईक'! ७ बड्या अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन
मिळालेल्या माहितीनुसार, निलंबित अधिकाऱ्यांमध्ये मुर्शिदाबाद जिल्ह्यातील समशेरगंज विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी (AERO) डॉ. सेफौर रहमान, फरक्का विधानसभा मतदारसंघाचे AERO नितीश दास, मयनागुरी विधानसभा मतदारसंघाचे AERO दलिया रे चौधरी, सुती विधानसभा मतदारसंघाचे AERO एसके मुर्शिद आलम, कॅनिंग पूर्व विधानसभा मतदारसंघाचे दोन AERO (सत्यजित दास आणि जॉयदीप कुंडू) आणि डेब्रा विधानसभा मतदारसंघाचे AERO देबाशिष बिस्वास यांचा समावेश आहे.
निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल्याच्या मुख्य सचिवांना या अधिकाऱ्यांविरूद्ध विभागीय शिस्तभांगाची कारवाई कऱण्याचे आदेश दिले आहे. तसेच उशीर न करता या कारवाईची माहिती देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेची निष्पक्षता आणि पारदर्शकता राखणे हे त्यांचे सर्वोच्च प्राधान्य आहे. असेही आयोगान म्हटलं आहे.
मतदार यादीची पुनरावृत्ती (SIR) ही एक संवेदनशील आणि महत्त्वाची प्रक्रिया आहे, ज्यामध्ये अपात्र मतदारांना यादीतून काढून टाकणे आणि पात्र मतदारांना समाविष्ट करणे समाविष्ट आहे. या प्रक्रियेतील कोणताही निष्काळजीपणा निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेला धोका निर्माण करू शकतो, असंही आयोगाकडू सांगण्यात आले आहे.
TCS Market Cap Falls: टीसीएसला मोठा धक्का! तब्बल ‘इतक्या’ कोटींची झाली घसरण.. जाणून घ्या सविस्तर
याशिवाय, ही कारवाई निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे, निवडणूक कामात कोणतीही अनियमितता किंवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. आगामी निवडणुकांसाठी आयोगाच्या तयारीचा हा एक भाग असल्याचा अस्पष्ट संदेशही या कारवाईतून देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
पाच राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाचे पथक आज, १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान आसामला भेट देणार आहे. या भेटीदरम्यान, निवडणूक आयोग विविध राजकीय पक्ष, वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठका घेईल आणि निवडणूक व्यवस्थेचा आढावा घेणार आहे,.






