नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका (State election) जवळ येत आहेत. यासाठी भाजपने आतापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची, उपमुख्यमंत्री बैठक बोलावण्यात आली आहे. (Meeting of Chief Ministers of States, Deputy Chief Ministers) दरम्यान, या बैठकीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पुष्कर सिंह धामी, हिमंता बिस्वा सरमा, भापेंद्र पटेल (Adityanath, Pushkar Singh Dhami, Himanta Biswa Sarma, Bhapendra Patel) आणि अन्य राज्यातील मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला पोहोचले आहेत. या बैठकीत मुख्यमंत्र्यांना आपापल्या राज्यातील विकास आणि कल्याणकारी योजनांचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच राज्यातील कामांचा आढावा, महत्त्वाचा योजना, विकास कामांबद्दल माहिती म्हणजे (Overview of works in the state, information about important schemes, development works) थोडक्यात काय तर रिपोर्ट कार्ड (Report Card) सादर करावे लागणार आहे.
[read_also content=”राष्ट्रपती शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री हजेरी लावणार, आज रात्री दिल्लीला रवाना होणार https://www.navarashtra.com/maharashtra/chief-minister-will-attend-president-swearing-ceremony-will-leave-for-delhi-tonight-307526.html”]
दरम्यान, आगामी विधानसभा आणि 2024 च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन भाजपचे हे पाऊल उचलण्यात आल्याचे मानले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशिवाय इतर वरिष्ठ नेतेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. तसेच या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील दिल्ली दौऱ्यावर असल्याने शपथविधी पार पडल्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी मंत्रिमंडळ विस्तार मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.