संग्रहित फोटो
नवी दिल्ली : राज्याच्या शालेय शिक्षण दर्जामध्ये (School Education) घसरण झाल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स 2.0’ मध्ये समोर आले आहे. याआधी महाराष्ट्र (Maharashtra Education) हा दुसऱ्या श्रेणीत होता. पण 2020-21च्या अहवालात महाराष्ट्र यंदा सातव्या श्रेणीत गेला आहे.
विशेष म्हणजे देशातील एकाही राज्याला पहिल्या पाच श्रेणींमध्ये स्थान मिळवता आलेले नाही. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जिल्ह्यांमधील शालेय शिक्षण व्यवस्थेची कामगिरीनिहाय वर्गवारी करणाऱ्या निर्देशांकाचा एकत्रितपणे अहवाल जारी केला आहे.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हे अभियान राबवित देशातील पहिल्या तीन राज्यात स्थान मिळविणाऱ्या महाराष्ट्राचा शिक्षण निर्देशांक आता घसरला आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या 2021-22 या शैक्षणिक सत्राच्या ‘पीजीआय’ अहवालात महाराष्ट्र अव्वल स्थानावरून थेट सातव्या स्थानावर घरंगळला आहे. तर जिल्हानिहाय जाहीर झालेल्या शिक्षण निर्देशांकातही बहुतांश जिल्ह्यांची शैक्षणिक पडझड पुढे आली आहे.
चारच जिल्हे अतिउत्तम
देशभरातील शिक्षणाची अवस्था जिल्हानिहाय अहवाल 2020-21 आणि ‘परफॉर्मन्स ग्रेडींग इन्डेक्स 2021-22’ अशा दोन वर्षांचा जाहीर झाला. हा अहवाल शिक्षण मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी यात गेल्या काही वर्षात केवळ चारच जिल्ह्यांना ‘अतिउत्तम’ महाराष्ट्राने सतत पहिला किंवा दुसरा क्रमांक श्रेणीमध्ये स्थान मिळाले आहे.