नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना टोल भरावा लागत असतो. त्यामुळे ही टोल यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याकडून वेळोवेळी प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार, नवनवीन यंत्रणाही विकसित केल्या जात आहेत. त्यात आता टोलसंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. सरकारकडून लवकरच टोल यंत्रणा रद्द करण्याचा विचार केला जात आहे.
#WATCH | Nagpur: On Toll tax, Union Minister Nitin Gadkari says, "Now we are ending toll and there will be a satellite base toll collection system. Money will be deducted from your bank account and the amount of road you cover will be charged accordingly. Through this time and… pic.twitter.com/IHWJNwM0QF
— ANI (@ANI) March 27, 2024
नितीन गडकरी यांनी टोलसंदर्भात एक मोठी माहिती शेअर केली आहे. सरकार लवकरच टोल यंत्रणा रद्द करण्याचा विचार करत आहे. त्या जागी आता नवीन प्रणाली येणार आहे, असे गडकरी यांनी म्हटले आहे. त्यांनी X प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात माहिती दिली आहे. टोल वसुलीची ही नवीन प्रणाली अथवा यंत्रणा उपग्रह आधारित असणार आहे. ही यंत्रणा लवकरच सुरू केली जाईल.
डिसेंबरला दिली होती माहिती
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मार्च 2024 पर्यंत नवी प्रणाली लागू करण्याचे उद्दिष्ट होते. त्या साहाय्याने टोल प्लाझावर लागणारा वेळ कमी होईल, असे नितीन गडकरी यांनी त्यावेळी म्हटले होते. त्यांनी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला असे म्हटले होते. मात्र, अद्याप ही यंत्रणा कार्यान्वित झाली नाही. त्यानुसार, प्रयत्न केले जात आहेत.