धक्कादायक! राष्ट्रध्वज फडकवल्याने नक्षलवाद्यांकडून तरुणाची हत्या, ‘जन अदालत’ भरवून दाबला गळा (फोटो सौजन्य-X)
Chhattisgarh News in Marathi: राष्ट्रध्वज फडकला म्हणून नक्षलवाद्यांनी एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील बिनागुंडा गावात सदरची घटना घडली आहे.
काही दिवसांपूर्वी आपण सर्वांनी देशाचा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा केला. छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील बिनागुंडा गावात स्वातंत्र्यदिनी भारताचा राष्ट्रध्वज फडकवत असताना मुनेश नूरूती या तरुणाची स्वातंत्र्यदिनी भारताचा राष्ट्रीय ध्वज फडकावल्याने नक्षलवाद्यांनी हत्या केली. या घटनेने छत्तीसगडमधील बस्तर परिसरात नक्षलवाद्यांच्या क्रूरतेने कळस गाठल्याचे अत्यंत दुर्दैवी प्रसंग समोर आले आहे.
१२ वी उत्तीर्ण मुनेश नूरूटी गावातील मोजक्या शिक्षित तरुणांपैकी एक होता. त्यामुळे १५ ऑगस्ट रोजी बिनागुंडा या आपल्या गावातील शाळेत नक्षलवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक असलेल्या नक्षल स्मारकावर राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेतला. तो व्हिडिओ चित्रित केला गेला आणि नंतर तो व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. तसेच, मुनेश नूरतिचा ध्वज फडकवतानाचा व्हिडिओ नक्षलवाद्यांपर्यंतच पोहोचला. दुसऱ्या दिवशी नक्षलवाद्यांचा एक गट गावात घुसला आणि गावकऱ्यांसमोर जनअदालत भरवली. त्यामध्ये नक्षलवाद्यांकडून राष्ट्रीय ध्वज अभिमानाने फडकवणाऱ्या मुनेशला आरोपी ठरवत पोलिसांचा मुखबीर सांगण्यात आलं. जन अदालतमध्ये मुनेशला दोषी ठरवत मृत्युदंड देण्यात आलं. नक्षलवाद्याने त्याच दिवशी मुनेशची गळा आवळून हत्या केली.
कुटुंबीयांनी नक्षलवाद्यांच्या भीतीपायी या घटनेची तक्रार पोलिसांकडे केली नाही आणि मुनेशचे अंत्यसंस्कार करण्यात आले. १७ ऑगस्ट रोजी, रोजी नक्षलवाद्यांनी गावाजवळ एक बॅनर लावलं आणि त्यामध्ये मुनेशला पोलिसांचा मुखभिर असल्याचे सांगत त्याला गद्दार असे सांगण्यात आले. १५ ऑगस्ट रोजी, नक्षल स्मारकावर मुनेशने अभिमानाने राष्ट्रध्वज फडकवत असल्याचा व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचला आणि मुनेशची हत्या राष्ट्रध्वज फडकवल्यामुळे झाली का, याचा आम्ही तपास करत आहोत, अशी माहिती कांकेरचेचे पोलिस अधीक्षक कल्याण एलिसेला यांनी दिली. संपूर्ण भारताचा राष्ट्रध्वज प्रत्येक नागरिकाच्या स्वातंत्र्यदिनी अभिमानाने फडकत असताना, त्याच भारतात, नक्षलवाद्यांच्या दहशतीखाली असलेल्या बस्तर भागातील गावांमध्ये, नक्षलवाद्यांकडून कायदा आणि संविधान कसे हिसकावून घेतले जात आहे, हा अत्यंत दुर्दैवी वाईट आणि लाजिरवाणा प्रसंग म्हणावा लागेल.