विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने यावर्षी यशाचे सर्व विक्रम मोडीत काढले. पण, तेव्हढाचं हा चित्रपटही वादग्रस्तही ठरला. गोव्यात नुकत्याच झालेल्या ५३व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI) शेवटच्या दिवशीही हा चित्रपट चर्चेचा विषय होता. याचं कारण म्हणजे ज्युरी प्रमुख आणि इस्रायली चित्रपट निर्माता नदाव लॅपिड यांनी या चित्रपटावर प्रश्न उपस्थित करत हा प्रोपोगंडा सिनेमा असल्याचं म्हण्टलं आहे.
[read_also content=”कोरोना लसीमुळे मृत्यू झाल्यास सरकार जवाबदार नाही! – केंद्र सरकार https://www.navarashtra.com/india/the-original-government-responsible-for-corona-vaccine-is-not-responsible-nrps-349371.html”]
गोव्यात पार पडलेल्या ५३व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा एक व्हिडिओ सद्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ज्युरी प्रमुख आणि इस्रायली चित्रपट निर्माता नदाव लॅपिड ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटावर टीका करताना दिसत आहे. केवळ प्रसार हाच एक या सिनेमाचा हेतू वाटत असल्याचं ते म्हणाले. त्यांनी या चित्रपटाला वाईट म्हणूनही संबोधलं. यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूरही उपस्थित होते.
IFFI मध्ये या चित्रपटाचं स्क्रिनींग आयोजीत करण्यात आलं होत. ते पाहिल्यानंतर त्यांनी प्रतिक्रीया दिली. नादव लॅपिड यांनी या चित्रपटावर टीका करत म्हण्टलं की हा चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धेत सामील होण्याच्याही लायकीचा नाही. हा चित्रपट केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचे त्यांनी सांगितले. नादव म्हणाले, ‘हा चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही सर्वजण हैराण आणि अस्वस्थ झालो. हा चित्रपट प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धात्मक विभागासाठी योग्य नाही.
अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी यांसारख्या स्टार्सनी सजलेला विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाइल्स’ 11 मार्च 2022 रोजी रिलीज झाला होता. चित्रपटगृहांमध्येही या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला. काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यात दाखविलेल्या घटनांच्या वस्तुस्थितीबाबत आधी प्रश्न उपस्थित केले जात होते. आता नादव लॅपिड यांनी मोठे वक्तव्य केले आहे. यावर विवेक अग्निहोत्री काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.