जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात शनिवारी रात्री झालेल्या चकमकीत दहशतवादी संघटनेचा दहशतवादी कमांडर निसार खांडे ठार झाला. तर तीन सैनिक आणि एक नागरिक जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांकडून एक एके ४७ रायफलसह शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. दहशतवादी संघटनेचा दहशतवादी कमांडर एचएम निसार खांडे ठार झाला. एके ४७ रायफलसह शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. याबाबत काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी ट्विट केले की, शोध सुरु आहे.
दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील ऋषीपोरा गावात कापरान भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या मोहिमेचे निरीक्षण करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गावात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त पथकाने घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली.
शोध पक्षाच्या संयुक्त पथकाने संशयित जागेला वेढा घातल्यानंतर दहशतवादी आणि शोध पथकामध्ये गोळीबार झाला. यावेळी, तीन दहशतवाद्यांना गोळ्या घालण्यात लष्कराला यश आले आहे. या वर्षातील ही ५६ वी चकमक होती. तसेच, यापूर्वीच्या कारवाईत २६ पाकिस्तानींसह ८९ दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. तर, ४४ सक्रिय दहशतवादी आणि त्यांच्या १८४ साथीदारांना अटक केली आहे. मात्र, यावर्षी काश्मीरमध्ये १७ नागरिक आणि १६ सुरक्षा जवान शहीद झाले आहेत.