तिरुपती बालाजी मंदिर दानपेटीमधील डॉलर चोरीचा लोकेश नारा यांनी व्हायरल व्हिडिओ शेअर केला (फोटो - सोशल मीडिया)
Tirupati donation theft : तिरुमला : तिरुपती बालाजी मंदिराचे भाविक संपूर्ण देशामध्ये आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी भाविक येतात. सर्वात श्रीमंत अशा मंदिरामध्ये सढळ हाताने भाविक देवाच्या श्रद्धेने दान करत असतात. मात्र आता तिरुपती बालाजी मंदिराच्या दानपेटीबाबत धक्कादायक दावा समोर आला आहे. मंदिरातील दानपेटीमधील पैसे चोरी झाली असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तिरुपती मंदिरातील या चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून मंदिराच्या ट्रस्टने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
तिरुपती मंदिरामध्ये मिळणाऱ्या लाडू प्रसादाबाबत मोठा वाद निर्माण झाला होता. वर्षभरापूर्वी या मंदिराच्या प्रसादामध्ये भेसळ असल्याचे उघडकीस आले होते. यावरुन मोठा वाद निर्माण झालेला असताना लोकांच्या श्रद्धेला देखील धक्का बसला होता. हे लाडूमधील भेसळ प्रकरणानंतर आता दानपेटीमधील चोरी हा मुद्दा गाजला आहे. आंध्रप्रदेशमधील भाजपा आणि पवन कल्याण यांच्या जनसेना पार्टीबरोबर सत्तेत असलेल्या तेलुगू देसम पार्टीन हा आरोप केला आहे. राज्यात वायएसआर काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी मंदिरातील दानपेटीतून कोट्यवधी रुपयांची चोरी झाल्याचे टीडीपीने म्हटले. या कथित घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी विशेष तपास पथकाची स्थापना केली. याचबरोबर चोरीचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तिरुपती बालाजी मंदिरातील दानपेटीतील चोरीचे प्रकरण सध्या सर्वत्र गाजते आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मात्र हे घोटाळ्याचे प्रकरण एप्रिल 2023 मधील आहे. त्यावेळी आंध्रप्रदेश राज्यात जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेस पक्षाचे सरकार होते. या प्रकरणात तिरुमला देवस्थानाचे माजी कर्मचारी रविकुमार यांच्यावर दानपेटीतून १०० डॉलरच्या नऊ नोटा चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आणि टीडीपीचे सरचिटणीस नारा लोकेश यांनी २० सप्टेंबर रोजी या घटनेचे कथित सीसीटीव्ही फुटेज शेअर केल्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेमध्ये आले. लोकेश यांनी माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी आणि तिरुमला मंदिर समितीचे माजी अध्यक्ष भुमाना करुणाकर रेड्डी यांच्यावरही १०० कोटी रुपयांची चोरीचा आरोप केला आहे.
लोक अदालतीचा निर्णय स्थगित
सतीश कुमार यांनी रविकुमार यांना मंदिरातील दानपेटीतून चोरी करताना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपी रविकुमार यांच्याविरोधात आयपीसीच्या कलम ३७९ आणि ३८१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात ३० मे २०२३ रोजी तिरुपती न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये एका लोक अदालतमध्ये हे प्रकरण निकाली काढण्यात आले. त्यावेळी सतीश कुमार आणि रवी कुमार यांनी प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन तडजोड केल्याचे सांगितले होते. गेल्या वर्षी 10 सप्टेंबर रोजी एम. श्रीनिवासुलू नावाच्या एका व्यक्तीने आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करून दानपेटीतील पैशांच्या कथित घोटाळ्याची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली होती. गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत लोक अदालतीचा निर्णय स्थगित केला.
#YCPTirumalaMahaPapam
వైసిపి గజదొంగలు శ్రీవారి సొత్తూ దోచుకున్నారు. వందకోట్ల పరకా’మనీ దొంగ’ వెనుక వైసీపీ నేతలు జగన్ ఐదేళ్ల పాలనలో అవినీతి రాజ్యమేలింది. అరాచకం పెచ్చరిల్లింది. దొంగలు, దోపిడీదారులు, మాఫియా డాన్లకు ఏపీని కేరాఫ్ అడ్రస్ చేసారు జగన్. గనులు, భూములు, అడవులు, సమస్త… pic.twitter.com/Pwssua12YM — Lokesh Nara (@naralokesh) September 20, 2025
देशांसंदर्भात बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तिरुपती बालाजी ट्रस्टचे म्हणणे काय?
मंदिरातील चोरीच्या प्रकरणावर तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्टकडून आपली भूमिका स्पष्ट केली. चोरीचे हे आरोप राजकीय सूडबुद्धीचे असूच शकत नाही. कारण हा कोट्यवधी भाविकांचा त्यावर विश्वास असल्याचे देवस्थानचे विद्यमान सदस्य व भाजपा नेते जी. भानुप्रकाश रेड्डी यांनी म्हटले. त्यावेळच्या मंदिर प्रशासनातील सदस्यांची ही गंभीर चूक आहे. रविकुमार यांच्याविरोधातील गुन्हे समेट करण्यायोग्य नसतानाही लोक अदालतीमध्ये हे प्रकरण मिटवण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला होता. या चोरीचा वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि वायएसआर काँग्रेसमधील नेतृत्वालाच मोठा फायदा झाला, असे भानुप्रकाश यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३७९ आणि ३८१ अंतर्गत चोरीसंबंधित गुन्हे दाखल करण्यात आले होते हे गुन्हे फक्त न्यायालयाने परवानगी दिल्यानंतरच मागे घेतले जातात, असेही ते म्हणाले आहेत.