पाकिस्तानची लागली लॅाटरी, उत्खननात सापडला गूढ खजिना; 2000 वर्षे जुना असल्याचा अंदाज!

पाकिस्तानच्या पुरातत्वशास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे. तिथल्या एका बौद्ध मंदिरात एक रहस्यमय खजिना सापडला आहे. हा खजिना पाहून पुरातत्व शास्त्रज्ञांचेही डोळे पाणावले.

    पृथ्वीच्या पोटात अनेक रहस्य दडलेली आहेत. अनेकवेळा अशी गुपिते उघडकीस येतात, जी जाणून लोक हैराण होतात. कधी उत्खननादरम्यान काही जुन्या वस्तू निघतात तर कधी खजाना हाती लागतो. असाच काहीसा प्रकार आता पाकिस्तानमधून उघडकीस आला आहे. पाकिस्तानच्या पुरातत्वशास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे. तिथल्या एका बौद्ध मंदिरात एक रहस्यमय खजिना सापडला (Treasure found in Pakistan Buddha Temple) आहे. हा खजिना पाहून पुरातत्व शास्त्रज्ञांचेही डोळे विस्फारले आहे. सुमारे 2000 वर्षांपूर्वी हा खजिना जुना असल्याच अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

    2000 वर्षे जुना असल्याचा अंदाज

    लाइव्ह सायन्सने पाकिस्तानमध्ये सापडलेल्या दुर्मिळ खजिन्याबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. हे दक्षिण-पूर्व पाकिस्तानमधील मोहेंजोदारोच्या विस्तीर्ण अवशेषांमध्ये स्थित असल्याचे मानले जाते. ही इमारत इ.स.पूर्व 2600 च्या आसपासची असल्याचे सांगितले जाते. पाकिस्तानच्या या दुर्मिळ खजिन्याबद्दल अनेक दावे केले जात आहेत. या खजिन्याबद्दल पाकिस्तानच्या पुरातत्वशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की मोहेंजोदारोच्या पतनानंतर सुमारे 1600 वर्षांचा हा खजिना आहे. पूर्वी येथे इमारती होत्या आणि अवशेष तयार झाल्यानंतर बौद्ध स्तूपांची स्थापना झाली. पुरातत्व शास्त्रज्ञांची संपूर्ण टीम आता हा खजिना हाताळत असून पुढील उत्खननाचे कामही सुरू आहे. येथे स्थापन झालेल्या बौद्ध स्तूपांमध्ये आणखी खजिना सापडू शकतो, असे मानले जाते.

    खजिन्यात हिरव्या रंगाची नाणी

    ज्यांनी पाकिस्तानात सापडलेला खजिना पाहिला त्यांनी सांगितले की, ही नाणी पूर्णपणे हिरव्या रंगाची आहेत. जर तांबे हवेच्या संपर्कात आले तर ते खराब होते, कदाचित म्हणूनच नाणी खराब होऊ नयेत म्हणून त्यांना रंगीत केले आहे. हा खजिना मातीच्या गोलाकार ढिगाऱ्यासारखा दिसतो कारण तो मातीत शतकानुशतके गाडला गेला आहे. सापडलेल्या खजिन्याचे एकूण वजन सुमारे 5.5 किलो आहे. या खजिन्याबद्दल स्थानिक लोकांमध्ये उत्सुकता असून त्याची झलक पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे.