सिधी : मध्य प्रदेशातील शुक्रवारी रात्री उशिरा मोठ भीषण अपघात (MP Accident) झाला. सिधी जिल्ह्यात (Sidhi Accident) हा अपघात झाला असुन ट्रकच्या धडकेने तीन बस उलटल्या. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर, एकूण 50 जण जखमी झाले आहेत. यातील 15-20 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अपघातानंतर रात्री उशिरा घटनास्थळी आणि रुग्णालयाला भेट दिली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये, गंभीर जखमींना दोन लाख रुपये आणि किरकोळ जखमींना एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर, मृतांच्या नातेवाइकांना त्यांच्या गुणवत्तेनुसार सरकारी नोकरी दिली जाईल, असेही ते म्हणाले.
[read_also content=”पुतीन यांना युद्ध पडले महागात ! युक्रेन युद्धाच्या एका वर्षात 9 ट्रिलियन डॉलर्स गमावले; 6300 टँक, 300 लढाऊ विमाने झाली नष्ट https://www.navarashtra.com/world/vladimir-putin-lost-half-of-tanks-pay-heavy-price-in-one-year-war-with-zelensky-ukraine-war-nrka-371984.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, सिधी जिल्ह्यात मोहनिया बोगद्याजवळील बरोखर गावाजवळ हा अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या ट्रकचा टायर फुटल्याने बाजूला उभ्या असलेल्या तीन बसेसवर धडकली. त्यानंतर दोन बस उलटल्या, तर तिसऱ्या बसचे मोठे नुकसान झाले. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे तर, प्रत्यक्षदर्शींच्या मते हा अपघात भीषण असला तरी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. गंभीर जखमींना रेवा येथे रेफर करण्यात आले आहे.
काल सतना येथे अमित शाह यांचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमातून या बस परतत होत्या. सतना येथील कोल जमातीच्या शबरी उत्सवात सहभागी होण्यासाठी सिधी येथुन काही लोक बसने निघाले होते दरम्यान, संध्याकाळी 5.30 वाजता कार्यक्रम संपला, त्यानंतर सर्व बसेस निघाल्या होत्या.
सतना येथून रामपूर बघेलान आणि रेवा मार्गे मोहनिया बोगद्यातुन बस जात होत्या. बोगद्यापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सिधी जिल्ह्यातील चुरहट पोलिस स्टेशन हद्दीतील बरखडा गावाजवळ तीन बस काही काळ थांबल्या होत्या. दरम्यान, मागून येणाऱ्या सिमेंटने भरलेल्या ट्रकने तिन्ही बसेसला धडक दिली. यातील एक बस पलटी झाली तर दुसऱ्या बसला जोरदार धक्का बसला. उलटलेल्या बसमधील काही जण गंभीर जखमी झाले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सिधी येथील रस्ता अपघातावर शोक व्यक्त केला आहे. सिधी (M.P.) येथील रस्ता अपघात अत्यंत दुःखद आहे. या दुर्घटनेत ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. जखमींवर प्रशासनाकडून उपचार सुरू आहेत. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करुया असं त्यांनी ट्विट केलं.