नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची घोषणा केव्हाही होऊ शकते असे असताना, निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. परंतु, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय समितीने १४ मार्च रोजी दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली आहे. आता देशाला दोन निवडणूक आयुक्त मिळणार आहेत.
हे आहेत नवीन निवडणूक आयुक्त
ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड केली, असे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी पॅनेलच्या बैठकीनंतर माध्यमांना सांगितले. लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोग अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांत निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी नवीन कायद्यानुसार पुनर्गठन करण्यात आलेल्या या पॅनेलच्या पहिल्या नियुक्त्या आहेत.
भारताच्या सरन्यायाधीशांना सोडून निवड समितीमध्ये आता पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि नियुक्त केंद्रीय कॅबिनेट मंत्री यांचा समावेश आहे.






