उजनी धरण (फोटो- सोशल मीडिया)
दौंड मधून १५६१८७ क्युसेक विसर्ग सुरू
अखेर दोन दिवसांत उजनी पाणीपातळी प्लसमध्ये
पाणीसाठ्यात 11 टीएमसी ने वाढ
टेंभुर्णी: मागील दोन दिवसांपासून पुणे जिल्हा व भीमा खोऱ्यातील जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने ६ मे २०२६ रोजी मायनस (मृत साठ्यात)गेलेल्या उजनी धरणाची पाणीपातळीत दौंडमधून १५६१८७ क्युसेक ने विसर्ग मिसळत असल्याने मायनस २८.११ टक्के झालेल्या पाणीपातळीत वाढ होत दोन दिवसांत उजनी बुधवारी दि ८ रोजी ६३ दिवसांनंतर पहाटे प्लस मध्ये येणार आहे.तर दौंड मधून मंगळावर दि ७ रोजी 1 लाख 56 हजार 187 क्यूसेक्स विसर्गाने पाणी येत आहे, हेच पाणी दुपारी 1 लाख 61 हजार क्यूसेक्स ने येत होते . सोमवारी रात्रीपासून पुणे परिसरात पाऊस बंद झाल्यामुळे उजनीत येणारा विसर्ग घटू लागला आहे.
चार दिवसापूर्वी पर्यंत उजनीची पातळी मायनस -28.11 %पर्यंत गेली होती सध्या ती मायनस -8.57% पर्यंत आलेली आहे, तीन दिवसात 20 टक्के पाणी धरणात आले असून पाणीसाठ्यात 11 टीएमसी ने वाढ झालेली आहे. पुणे जिल्ह्यातील मुळा, मुठा, पवना इंद्रायणी नद्यां ची सद्यस्थिती पाहता यापुढे चार ते पाच दिवसात 22 ते 25 टीएमसी पाणी उजनीत येईल असा नियंत्रण कक्षाचा अंदाज आहे तसेच आठ जून रोजी सकाळपर्यंत चार ते पाच टक्के जिवंत पाणीसाठा तयार झालेला असेल. 30 जून पासून पुणे, मावळ भाग, लोणावळा पश्चिम विभाग व त्यानंतर पाच जुलैपासून भीमाशंकर जे डोंगरात मुसळधार पाऊस झालेला असल्यामुळे उजनीच्या वरील 19 धरणामध्ये 70 ते 80 टक्के पाणीसाठा तयार झाला आहे, त्यामुळे आगामी तीन महिने पावसाळ्याचा विचार करता या सर्व धरणातून पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी कांही प्रमाणात नियमित खाली पाणी सोडणे अपरिहार्य ठरणार आहे, त्यामुळे दौंड येथून उजनी जलाशयात सातत्याने कमी अधिक विसर्ग चालूच राहणार आहे.
मोटारी वर आणण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग
उजन ची पाणी पातळी वजा २८.११ टक्के इतकी खालावली होती. बॅकवॉटर परिसरातील शेतकऱ्यांनी पाणी खाली गेल्याने आपल्या मोटारी,केबल आणि पाईप पाण्याच्या दिशेने ठेवले होते. परंतु.दोन दिवसांत १२ टीएमसी पाणी जमा झाल्याने पाणीपातळी वाढली आहे.परीसरातील शेतकरी आपल्या मोटारी पुन्हा जागेवर ठेवण्याची लगबग सुरू आहे.
सात जुलै उजनीची सायंकाळची स्थिती
पाणी पातळी…. 490.350 मीटर
एकूण साठा…. 59.07टी एम सी
उपयुक्त साठा…. मायनस -4.59 टीएमसी टक्केवारी……. मायनस – 8.57%
*विसर्ग
दौंड येथून येणारा विसर्ग….
1 लाख 56 हजार 187 क्यूसेक्स.
असा आला विसर्ग
६/७ रोजी ८०९१८ क्यु.
७/७/ रा.१ वा १०४७०८ क्युसेक
रा.१२ वा.१२३३९५ क्युसेक
रा ३ वा.१२७६९६ क्युसेक
सकाळी ६ वा १४५५६१ क्युसेक
दु ३ वा १६१८४४ क्युसेक
सा.६ वा.१५६१८७ क्युसेक
वरील पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उजनीत येणारा विसर्ग हळूहळू कमी होऊन बुधवारी सायंकाळी ६० ते ७० हजार क्यूसेक्स असेल.






