हर्षित आणि प्रिन्सने इंग्लंडचे कंबरडे मोडले (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
IND Vs ENG Live: आज जिंकावेच लागणार! श्रेयस अय्यरचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
इंग्लंडचा खेळ
इंग्लंडने ४३ धावांवर आपली पहिली विकेट गमावली. धोकादायक फलंदाजी करणाऱ्या जोस बटलरची ही विकेट होती आणि प्रिन्स यादवने ही महत्त्वाची विकेट काढत भारताला उत्तम सुरुवात करून दिली. बटलरने या सामन्यात चार चौकार आणि दोन षटकारांसह ३६ धावा केल्या. यानंतर प्रिन्स यादवने इंग्लंडला आणखी एक मोठा धक्का दिला. जोस बटलरला बाद केल्यानंतर, त्याने इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकलाही बाद केले. ब्रुक १६ धावांवर बाद झाला. यावेळी इंग्लंडची धावसंख्या ७१ धावांवर २ गडी बाद अशी होती. त्यानंतर बेथलने काही चांगले शॉट्स खेळून खेळामध्ये रंगत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र ११ व्या ओव्हरमध्ये हर्षित राणाने आपली जादू दाखवत लागोपाठ दोन बॉलवर बेथल आणि बँटनची पहिल्याच बॉलवर विकेट काढली.
दुसऱ्या बाजूने फिन सॉल्टने लढा दिला आणि ३६ चेंडूमध्ये त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. पण दुसऱ्या बाजूने मात्र इंग्लंडची टीम ढासळली. वरूण चक्रवर्तीला कोणतीही विकेट मिळाली नाही मात्र त्याने ३३ धावा दिल्या. तर अर्शदीपने दुसऱ्या बाजूने चांगली बाजू लाऊन धरली. अक्षर पटेलला मात्र फिन सॉल्टने मैदानावर घाम फोडला असं असूनही अत्यंत महत्त्वाच्या क्षणी अक्षरनेच सॉल्टची विकेट घेत भारताला दिलासा दिला. इंग्लंडसाठी सर्वाधिक ७० धावा करत तो तंबूत परतला. यानंतर आलेल्या विल जॅक्सने लागोपाठ अक्षरला छक्के मारत आपले मनसुबे दाखवून दिले. मात्र अक्षरने फेकलेल्या बॉलने तो रन आऊट झाला आणि त्याने १४ धावांची भर घातली. याशिवाय सॅम करननेदेखील २४ बॉल्समध्ये ४१ धावा काढल्या. भारताने काही ठिकाणी ढिसाळ क्षेत्ररक्षण केले आणि त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंना अधिक धावा करता आल्या.
वैभव सूर्यवंशीवर सर्वांची नजर
पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वैभव सूर्यवंशीकडे लागले आहे. त्याने मागील सामन्यात पदार्पण केले आणि १० चेंडूंमध्ये केवळ १४ धावा करून तो बाद झाला. त्याने आपल्या खेळीत दोन षटकार मारले. तिसऱ्या टी-२० सामन्यात वैभव किती धावा करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. शिवाय, आजच्या सामन्यासाठी भारतीय टीम कशी खेळणार हेच पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.
IND vs ENG: नव्याने सुरूवात! आता इंग्लंडला भिडणार Team India, पूर्ण शेड्युलची लिस्ट
कसे आहेत दोन्ही संघ
इंग्लंडचा संघ (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, जोस बटलर (यष्टीरक्षक), हॅरी ब्रूक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, जोश टोंगे
भारतीय संघः वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, प्रिन्स यादव, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती






