उपराष्ट्रपती पद निवडणूक 2025 इंडिया आघाडीमध्ये बी. सुदर्शन रेड्डी यांच्या उमेदवारीवरुन ममता बॅनर्जी मतभेद झाले आहे (फोटो - सोशल मीडिया)
नवी दिल्ली : देशामध्ये एकीकडे विरोधकांनी मतचोरीच्या आरोपांना रान पेटवले आहे. तर दुसरीकडे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पावसाळी अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले होते. यानंतर एनडीएकडून सी पी राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर इंडिया आघाडीकडून देखील बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र या उमेदवारीवरुन इंडिया आघाडीमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे.
इंडिया आघाडीच्या उपराष्ट्रपती पदासाठी दिल्लीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक काल (दि.18) पार पडली. यामध्ये प्रमुख नेत्यांच्या मतांनी इंडिया आघाडीचा उमेदवार ठरवण्यात आला. इंडिया आघाडीने बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा देखील केली आहे. मात्र, तरीही५ विरोधी पक्षांमध्ये अद्याप अंतिम एकमत झालेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तृणमूल काँग्रेस (टीएमसी) चे असे म्हणणे आहे की इंडिया अलायन्सचा उमेदवार तामिळनाडूचा नसावा आणि ममता बॅनर्जी यांच्या पक्षानेही या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यामुळे इंडिया आघाडीमध्ये उमेदवारीवरुन दुमत झाल्याचे दिसून येत आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तृणमूल काँग्रेसला विरोधकांनी असा उमेदवार उभा करावा अशी इच्छा आहे जो राजकारणाच्या पलीकडे असेल आणि भाजप आणि आरएसएसच्या विचारसरणींविरुद्ध ठामपणे उभा राहू शकेल. पक्षाचे म्हणणे आहे की ही केवळ उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक नाही तर संविधान आणि “भारताच्या आदर्शांचे” रक्षण करण्यासाठीची लढाई आहे. त्यामुळे इंडिया आघाडीकडून जाहीर करण्यात आलेल्या आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असलेल्या बी. सुदर्शन रेड्डी यांच्याबाबत क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता आहे.
इंडिया आघाडीची बैठक झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ’ब्रायन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरातून बाहेर पडताना म्हणाले की, “उद्या म्हणजे मंगळवारी दुपारी १२:३० वाजता मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक होईल.” त्यांनी आशा व्यक्त केली की विरोधी पक्ष संध्याकाळपर्यंत त्यांच्या मजबूत उमेदवाराचे नाव जाहीर करेल.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना दीर्घ आणि प्रभावी राजकीय अनुभव आहे. ते ३१ जुलै २०२४ पासून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आहेत. राधाकृष्णन यांच्याबद्दल एक मनोरंजक गोष्ट म्हणजे त्यांना कधीकधी ‘तामिळनाडूचे मोदी’ असेही म्हटले जाते. त्यांच्या उत्कृष्ट संघटनात्मक कौशल्यामुळे त्यांना हे टोपणनाव मिळाले. ज्याप्रमाणे पंतप्रधान मोदींनी गुजरातमध्ये पक्ष मजबूत केला, त्याचप्रमाणे तामिळनाडूमध्ये पक्षाचे स्थान मजबूत करण्यात राधाकृष्णन यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. ते फेब्रुवारी २०२३ ते जुलै २०२४ पर्यंत झारखंडचे राज्यपाल होते. या काळात राष्ट्रपतींनी त्यांना तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे उपराज्यपाल अशी अतिरिक्त जबाबदारी सोपवली. त्यानंतर आता त्यांना उपराष्ट्रपती म्हणून एनडीएकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.