Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WB Assembly Election 2026: ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार; महेश जेठमलांनीनी सांगितली कायदेशीर प्रक्रिया

ममता बॅनर्जी  यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. आमच्या तृणमूल काँग्रेसे  “नैतिक विजय” मिळवला असून राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 06, 2026 | 10:36 AM
Mamata Banerjee, West Bengal Election Result, Resignation Controversy, TMC vs BJP, Election Commission India,

Mamata Banerjee, West Bengal Election Result, Resignation Controversy, TMC vs BJP, Election Commission India,

Follow Us
Close
Follow Us:
  • बहुमताचा आकडा भाजपकडे असतानाही ममता बॅनर्जी यांनी तांत्रिक आणि नैतिक कारणास्तव राजीनामा देण्यास नकार
  • मतमोजणी केंद्रावर आपल्याला धक्काबुक्की झाल्याचा आणि एजंटना मारहाण झाल्याचा गंभीर आरोप
  • हा विजय भाजपचा नसून यंत्रणेचा आहे, त्यामुळे ही लढाई रस्त्यावर सुरूच राहील- ममता बॅनर्जींचा इशारा
West Bengal Assembly Election 2026: पश्चिम बंगालमधील विजय नैतिकदृष्ट्या आपलाच आहे असा दावा करत ना राजभवनाला भेट देणार, ना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार, असा पवित्रा घेत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आक्रमक पवित्रा घेत नव्या राजकीय वादाला तोंड फोडले आहे. या विधानानंतर बंगालपासून दिल्लीपर्यंतच्या राजकीय वर्तुळात त्यांच्या शब्दांचा नेमका अर्थ काय, यावर एक नवी चर्चा सुरू झाली आहे.

कोलकाता येथे आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, मी राजीनामा देणार नाही. मी राजभवनात जाणार नाही. आम्ही हरलो नाही, तर आम्हाला हरवले गेले आहे. ही लढाई भाजपसोबत नव्हती तर निवडणूक आयोगाशी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संगनमत करून निवडणुकीत त्यांचा पराभव करण्यासाठी निवडणूक आयोगाचा वापर केला, असा आरोप मावळत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. पश्चिम बंगालमधील या निवडणुकातील या संपूर्ण प्रकरणाचे वर्णन ‘बंगालच्या इतिहासातील एक काळा अध्याय’ असे केले.

Mamata Banerjee: पश्चिम बंगालमध्ये घटनात्मक पेच! पराभवानंतरही ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार; काय आहेत राज्यपालांचे अधिकार?

ममता बॅनर्जी  यांच्या भूमिकेवर सरकारी वकील महेश जेठमलानी यांनी काही कायदेशीर प्रक्रिया सांगितल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी ममता बॅनर्जींच्या भूमिकेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.  वकील जेठमलानी म्हणाले की, जर ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्यास नकार दिला, तर त्यांना पदावरून हटवले जाऊ शकते. अत्यंत टोकाच्या परिस्थितीत राज्यपालांकडे कारवाई करण्याचे अधिकार असल्याचेही त्यांनी सूचित केले.

दरम्यान, ममता बॅनर्जी  यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. आमच्या तृणमूल काँग्रेसे  “नैतिक विजय” मिळवला असून राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी  राजीनामा देण्यासाठी राजभवनात जाणार नाहीत आणि पुढील रणनीतीसाठी पक्षातील नेत्यांशी चर्चा करतील. तसेच, “आमचा लढा भाजपशी नव्हता, तर निवडणूक आयोगाशी होता,” असे सांगत त्यांनी केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर आणि निवडणूक प्रक्रियेवर टीका केली.

त्यात निवडणूक आयोगदेखील भाजपच्या हितासाठी काम करत असल्याचे सातत्याने दिसत आहे, अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावरही गंभीर आरोप केले. पण  त्यांच्या या वक्तव्यांमुळे राज्यात राजकीय वातावरण अधिक तापले आहे.

Government Formation: निकालापासून शपथविधीपर्यंत सत्ता कोणाकडे असते? लोकशाहीतील ‘संक्रमण काळा’चे काय आहेत घटनात्मक नियम?

तज्ज्ञांच्या मते, जर मुख्यमंत्री राजीनामा देत नसतील आणि नवीन जनादेश स्पष्ट असेल, तर राज्यपाल घटनात्मक अधिकारांचा वापर करून पुढील निर्णय घेऊ शकतात. यामध्ये सरकार बरखास्त करणे किंवा नवीन सरकार स्थापनेसाठी प्रक्रिया सुरू करणे यांचा समावेश होऊ शकतो.

सध्याच्या पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ ७ मे २०२६ रोजी संपत असल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे. कार्यकाळ संपल्यानंतर, राज्यपालांना विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार असतो. त्यामुळे मुख्यमंत्री राजीनामा देत नसले तरी, घटनात्मक प्रक्रिया पुढे सरकू शकते.

एकूणच, ममता बॅनर्जींची ठाम भूमिका आणि कायदेशीर तज्ज्ञांचे मत यामुळे पश्चिम बंगालमध्ये संभाव्य घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील काही दिवसांत राज्यपालांचा निर्णय आणि राजकीय घडामोडी यावरच या प्रकरणाचे भवितव्य ठरणार आहे.

Web Title: Wb assembly election 2026 mamata banerjee refuses to resign mahesh jethmalani explains the legal process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 10:36 AM

Topics:  

  • BJP
  • election commission of india
  • Mamta Banarjee
  • West Bengal Election Result 2026

संबंधित बातम्या

भाजप सरकारला परीक्षाही घेता नाहीत; NEET पेपरफुटी प्रकरणावरुन हर्षवर्धन सपकाळ आक्रमक
1

भाजप सरकारला परीक्षाही घेता नाहीत; NEET पेपरफुटी प्रकरणावरुन हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

“ही केवळ नाकामी नाही, तर तरुणांच्या भविष्याशी केलेला गुन्हा!”; NEET परीक्षा रद्द झाल्याप्रकरणी राहुल गांधींचा तीव्र हल्लाबोल
2

“ही केवळ नाकामी नाही, तर तरुणांच्या भविष्याशी केलेला गुन्हा!”; NEET परीक्षा रद्द झाल्याप्रकरणी राहुल गांधींचा तीव्र हल्लाबोल

Nana Patole on PM Narendra Modi: “उपदेश देण्यापूर्वी स्वतःच्या…!” नाना पटोलेंचा पंतप्रधान मोदींना थेट सवाल
3

Nana Patole on PM Narendra Modi: “उपदेश देण्यापूर्वी स्वतःच्या…!” नाना पटोलेंचा पंतप्रधान मोदींना थेट सवाल

Rohit Pawar: “आधी तुमची उधळपट्टी थांबवा मग जनतेला सांगा!”; पंतप्रधान मोदींच्या ‘बचत’ मंत्रावर रोहित पवारांचा जोरदार हल्लाबोल
4

Rohit Pawar: “आधी तुमची उधळपट्टी थांबवा मग जनतेला सांगा!”; पंतप्रधान मोदींच्या ‘बचत’ मंत्रावर रोहित पवारांचा जोरदार हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.