नवी दिल्ली : सध्या लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha 2024) देशभरातील अनेक ठिकाणी मतदान सुरु झालेले आहे. सर्वच पक्षांकडून आपापल्या पक्षातील उमेदवारांचा प्रचार केला जात आहे. असे असताना भाजपच्या प्रचाराच्या मुद्यांवर प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठीने (YouTuber Dhruv Rathee) सडकून टीका केली आहे. पंतप्रधान मोदींनी दिलेल्या काही आश्वासनांची तपशीलवार माहिती देत निशाणा साधला.
मोदी जी के फ़र्ज़ी गारंटी का पर्दाफ़ाश ध्रुव राठी ने कर दिया। #Dhruv_Rathee pic.twitter.com/VKi18nAaUr — Ritu Choudhary (@RituChoudhryINC) April 16, 2024
ध्रुव राठीने ‘मोदी की गॅरंटी’वर नवा व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्याने मोदी सरकारवर टीका केली. भ्रष्टाचार, बेरोजगारीसह ज्या नेत्यांनी भ्रष्टाचार केला असे नेते भाजपमध्ये किंवा भाजपसोबत असल्याचे त्याने म्हटले आहे. तसेच ज्या लोकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे किंवा भाजपला पाठिंबा देण्यास नकार दिला अशा काही लोकांना तुरुंगात टाकण्याचे काम मोदी सरकारने केल्याचे त्याने म्हटले आहे.
या नेत्यांमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन या नेत्यांचा समावेश आहे. त्यात केजरीवाल आणि सोरेन यांच्याविरोधात कोणताही पुरावा अद्याप मोदी सरकारला मिळाला नाही. तरीदेखील त्यांना तुरुंगात टाकल्याचे ध्रुव राठीने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या ट्विटर चांगलाच ट्रेंड होत आहे.