Ahilyanagar News: भारत भूषण सोहळ्यात देशभरातील 175 शाळांच्या प्राचार्य-शिक्षणतज्ञांचा गौरव
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलन आणि गणेश आरतीने झाली. विद्यार्थ्यांनी सादर केलेली गणेश वंदना, प्रभावी योग प्रात्यक्षिके आणि ‘शिव गर्जना’ या सादरीकरणांनी उपस्थित मान्यवरांना मंत्रमुग्ध केले. सभागृहात शिस्त, सांस्कृतिक रंगत आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळाली. शाळेचे संचालक संजय चव्हाण यांची विशेष उपस्थिती लाभली.
Mumbai Climate Week 2026 मध्ये महत्त्वाचे सामंजस्य करार; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंची खास उपस्थिती
शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सचदेव यांनी ‘भारत भूषण सन्मान’ उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, मागील वर्षी सुरू झालेल्या या उपक्रमाला यंदाही देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. देशातील सुमारे १७५ राष्ट्रीय पातळीवरील शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञ या सोहळ्यास उपस्थित होते. शिक्षणाच्या माध्यमातून भारताला प्रगतीच्या दिशेने नेण्याचा हा व्यापक प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
विशेष मान्यवर आराधना राणा यांनी “शाळांमध्ये परिवर्तन घडविणारे नेतृत्व” या विषयावर मार्गदर्शन केले. नेतृत्वामध्ये अधिकार, सहानुभूती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा समतोल राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “अधिकार, सहानुभूती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा समतोल” या विषयावरील परिसंवादाचे सूत्रसंचालन सीमा नेगी यांनी केले. दीपिका नगरवाला, रिती मल्होत्रा, स्वाती पटेल आणि कल्पेश राठोड यांनी आधुनिक नेतृत्व, डिजिटल परिवर्तन आणि मूल्याधारित शिक्षणावर आपले विचार मांडले.
Gram Panchayat Election: लांजा तालुक्यात रंगणार ग्रामपंचायत पोटनिवडणूक
कार्यक्रमादरम्यान ‘एलिट प्रिन्सिपल क्लब’ चे उद्घाटन करण्यात आले. देशभरातील शाळा प्रमुखांमध्ये संवाद, समन्वय आणि नवकल्पनांची देवाणघेवाण वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. विविध शैक्षणिक उपक्रमांची घोषणाही यावेळी करण्यात आली. सूत्रसंचालन नववीतील श्रद्धा गोड आणि पायल राऊत यांनी केले, तर सहावीतील आलिया खाटिक हिने आभार प्रदर्शन केले.
या मेळाव्यात प्राचीन शैक्षणिक परंपरेपासून ते आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत झालेल्या प्रवासाचा आढावा घेण्यात आला. पारंपरिक मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालणे ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित करण्यात आले. मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या एमबीडी समूहाच्या प्रशिक्षण विभागातील उपमहाव्यवस्थापक रिती मल्होत्रा यांनी ग्रामीण भागापर्यंत अद्यावत शिक्षण पोहोचल्यास देशाचे भविष्य अधिक उज्ज्वल होईल, असा विश्वास व्यक्त केला. शिक्षकांनी डिजिटल साधने आत्मसात करणे, सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि सक्षम नेतृत्व विकसित करणे हे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे आधारस्तंभ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.






