देशातील बेरोजगारी दरात ५ टक्क्यांपर्यंत किरकोळ वाढ; हिवाळ्यातील हंगामी घटकांचा परिणाम
Unemployment Rate 2026: भारतात १५ वर्षे आणि त्यावरील वयोगटातील लोकांमध्ये बेरोजगारीचा दर जानेवारी २०२६ मध्ये किरकोळ वाडून ५ टक्क्यांपर्यंत पोहोचला, यापूर्वी, डिसेंबर २०२५ मध्ये हा दर ४.८ टक्के नोंदवला गेला होता, असे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ) ने जारी केलेल्या नवीनतम नियतकालिक कामगार दल सर्वेक्षणात म्हटले आहे.
एनएसओनुसार, बेरोजगारी दरातील ह वाढ कोणत्याही संरचनात्मक कमकुवतपणामुळे नाही तर हंगामी घटकांमुळे आहे.
क्षेत्राच्या उलाढालीत नैसर्गिक घट
हिवाळ्याचा परिणामः बांधकाम, वाहतूक आणि लघु व्यवसाय यासारख्या क्षेत्रात हिवाळ्यात कामाची गती मंदावते.
तात्पुरता विलंबः या काळात काही कामगार सक्रियपणे काम शोधत नाहीत. एकूण लोकसंख्येमध्ये काम करणाऱ्या किंवा काम शोधणाऱ्या लोकांचे प्रमाण किंचित कमी झाले.
कामगार लोकसंख्या प्रमाण (डब्ल्यूपीआर)
जानेवारीमध्ये ग्रामीण भागात एकूण लोकसंख्येतील काम करणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण (डब्ल्यूपीआर) ५६.२% पर्यंत घसरले.
लिंग परिस्थिती
डेटा दर्शवितो की, पुरुषांसाठी बेरोजगारीचा दर स्थिर राहिला, परंतु डिसेंबरच्या तुलनेत महिलांसाठी बेरोजगारीचा दर वाढला. तथापि, एनएसओने स्पष्ट केले की ही वाढ एप्रिल-डिसेंबर २०२५ च्या सामान्य मर्यादित आहे आणि ती केवळ ‘अल्पकालीन चढउतार’ आहे.
जानेवारी २०२६ मधील ताज्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण बेरोजगारीच्या दरात वाढ झाली असून शहरी भागातील स्थिती अधिक चिंताजनक दिसून येत आहे. डिसेंबर २०२५ च्या तुलनेत ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही क्षेत्रांत बेरोजगारीचा आलेख उंचावला आहे.
बेरोजगारी दराची तुलनात्मक आकडेवारी:
| क्षेत्र | डिसेंबर २०२५ | जानेवारी २०२६ |
| सर्व भारत (एकूण) | ४.८% | ५.०% |
| ग्रामीण क्षेत्र | ३.१% | ४.२% |
| शहरी क्षेत्र | ६.७% | १०.०% |
डिसेंबरमध्ये ६.७% वर असलेला शहरी बेरोजगारीचा दर जानेवारीत थेट १०.०% वर पोहोचला आहे, तर ग्रामीण भागातही १.१% ची वाढ नोंदवण्यात आली आहे. यामुळे राष्ट्रीय सरासरी ४.८% वरून ५.०% झाली असून, वाढती बेरोजगारी रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.






