नागपूर (Nagpur). नागपूर मनपाच्या (Nagpur Municipal Corporation) आरोग्य विभागाकडून (health department) मंगळवारी प्राप्त अहवालानुसार शहरात केवळ ०६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची (corona positive patients) नोंद करण्यात आली. कोरोना रुग्णांची घटती संख्या बघून शहरातील नियंत्रणाबाहेर गेलेली कोरोनाची स्थिती (corona out of control) पूर्णपणे आटोक्यात आल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. शहरात सध्या १६८ Corona Active रुग्ण आहेत.
[read_also content=”नागपूर/ ‘शक्तिमान’चा उपचारादरम्यान मृत्यू; खूनाच्या घटनेतून झाला होता हल्ला https://www.navarashtra.com/latest-news/shaktiman-dies-during-treatment-the-attack-was-the-result-of-a-murder-nrat-161505.html”]
आरोग्य विभागातर्फे मंगळवारी ४७०३ रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यापैकी ४६९३ रुग्ण कोरोना निगेटिव्ह आढळले. आज शहरात कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचे नोंदविण्यात आले. आजारावरील उपचारांमुळे १० कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.
लसिकरण टीमतर्फे मंगळवारी ८ लाख ९६ हजार ०४५ रुग्णांना कोरोना लसीचा पहिला डोज देण्यात आला. कोरोनाचा दुसरा डोज घेणाऱ्यांची संख्या ३ लाख ६४ हजार १४५ इतकी नोंदविली गेली. शहरात कोरोना व्हॅक्सिनेशनची एकूण आकडेवारी १२ लाख ६० हजार १९० आहे.