मुंबई : सूंपर्ण राज्यासह मुंबईतील धारावी, दादर, आणि माहीम येथील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५०१३ वर पोहोचली आहे. आज या विभागात ७० नवीन रुग्णांची भर पडली असून धारावीत मंगळवारी ११ नवीन रुग्णाची नोंद झाली असून रुग्णांचा आकडा २३९२ वर पोचला. तर धारावीत आज ही रूग्णाचा मृत्यू झालेली नाही. धारावीसह दादर, माहीम या जी उत्तर विभागात एकूण ७०३ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
धारावीत आज ११ नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची संख्या २३९२ वर पोहोचली आहे. मृतांचा आकडा ८१ इतकाच आहे. धारावीत केवळ ८६ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर दादरमध्ये आज ३१ नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही १२१८ इतकी झाली आहे. तर आजपर्यंत १६ मृत्यू झाले आहेत.
माहीममध्ये आज २८ नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या १४०३ इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा १४ इतकाच आहे. दरम्यान, धारावीसह, दादर, माहीम या तीनही परिसरात मिळून आज दिवसभरात ७० नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या ५०१३ इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा १११ इतका आहे. आतापर्यंत दादर मध्ये एकूण ७९८, माहीम मध्ये एकूण १०६८ तर धारावीत २०५७ असे एकूण ३९२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.