देशात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या ३४५१ नव्या कोरोना रुग्णांची ( Corona Cases) नोंद झाली असून ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २० हजार ६३५ वर गेलेली आहे.
शनिवारी देशात ३८०५ नवीन कोरोनाबाधितांची नोद करण्यात आली होती तर २२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. गेल्या २४ तासांत ३०७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ४ कोटी २५ लाख ५७ हजार ४९५ वर पोहोचला आहे.
[read_also content=”माझ्याविरोधात निवडणूक लढा आणि जिंकून दाखवा, नवनीत राणांचं उद्धव ठाकरेंना आव्हान https://www.navarashtra.com/maharashtra/fight-the-election-against-me-and-win-navneet-rana-challenges-uddhav-thackeray-nrps-277480.html”]
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या २० हजार ६३५
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या २० हजार ६३५ इतकी झाली आहे. शविवारी दिवसभरात देशात ३०७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या २४ तासांत ४० कोरोनोरुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत कोरोनामुळे ५ लाख २४ हजार ६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना संसर्गाचा दैनंदिन दर वाढून ०.०५ टक्क्यांवर पोहोचला आहे. शनिवारी दिवसभरात देशात ३ लाख ६० हजार ६१३ नमुन्यांची चाचणी करण्यात आली.
[read_also content=”हातलोटमध्ये अतिवृष्टीच्या जखमा अजून ताज्याच; दहा महिन्यानंतरही मदत नाहीच https://www.navarashtra.com/maharashtra/after-10-months-also-no-any-help-given-in-hatlot-incident-nrka-277493.html”]