पुणे : सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत श्रीकांत पानसे याने केलेल्या ४७ धावांच्या जोरावर पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबने सॅफरॉन क्रिकेट क्लबचा ३१ धावांनी पराभव करून बाद फेरी गाठली. पहिल्यांदा फलंदाजी करताना पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबने १८८ धावांचे लक्ष्य उभे केले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना सॅफरॉन क्रिकेट क्लबचा डाव १५७ धावांवर मर्यादित राहीला.
कॉर्पोरेट विलोव्हर्स क्लबचा ३२ धावांनी पराभव
दुसर्या सामन्यामध्ये विश्वास कुंभार याने फटकावलेल्या ८२ धावांच्या खेळीच्या जोरावर ब्रेव्हहार्ट क्रिकेट क्लबने कॉर्पोरेट विलोव्हर्स क्लबचा ३२ धावांनी पराभव केला आणि पुढील फेरी गाठली. विश्वास याने ४८ चेंडूत ६ चौकार, ५ षटकारांच्या मदतीने ८२ धावांची खेळी करून ब्रेव्हहार्ट क्रिकेट क्लबला १७७ धावांची धावसंख्या गाठून दिली होती. याला उत्तर देताना कॉर्पोरेट विलोव्हर्स क्लबचा डाव १४५ धावांवर संपुष्टात आला. सुरज झा (७३ धावा) आणि संदीप मौर्या (७६ धावा) यांनी केलेल्या दमदार फलंदाजीमुळे रायझिंग बॉईज क्लबने रॉयल स्पोटर्स क्लबचा ९६ धावांनी सहज पराभव करून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबः २० षटकात ९ गडी बाद १८८ धावा (श्रीकांत पानसे ४७ (२२, १ चौकार, ६ षटकार), राहूल सिद्धार्था ३२, अम्रित अलोक ३०, स्वानंद भागवत २६, कुणाल सुर्वे ३-४५, रोहन देशमुख २-२७) वि.वि. सॅफरॉन क्रिकेट क्लबः १९ षटकात १९ गडी बाद १५७ धावा (ओजस साठे ६३ (३२, ३ चौकार, ६ षटकार), संकेत जोशी २६, निखील नासेरी ३-३१, कपिल कुर्लेकर २-१८, अम्रित आलोक २-१८); सामनावीरः श्रीकांत पानसे;
ब्रेव्हहार्ट क्रिकेट क्लब : २० षटकात ७ गडी बाद १७७ धावा (विश्वास कुंभार ८२ (४८, ६ चौकार, ५ षटकार), फरहान खान २६, नितीन चौहान ३-३५) वि.वि. कॉर्पोरेट विलोव्हर्स क्लबः १६.५ षटकात १० गडी बाद १४५ धावा (लहुकूमार राऊत ३९, विशाल पवार ३७, स्वप्निल पाटील ३-२४, विश्वास कुंभार १-२७); सामनावीरः विश्वास कुंभार;
रायझिंग बॉईज क्लब : २० षटकात ४ गडी बाद २२४ धावा (सुरज झा ७३ (५८, ६ चौकार, ४ षटकार), संदीप मौर्या ७६ (२४, ४ चौकार, ९ षटकार), पीटर वॉल्टर ४३); (भागिदारीः तिसर्या गडयासाठी सुरज आणि संदीप यांच्यामध्ये ९८ (४२) वि.वि. रॉयल स्पोटर्स क्लबः १८.३ षटकात ९ गडी बाद १२८ धावा (शुभम पडवळ २९, सारंग उजवणे २५, शाम बिष्णोई ३-१७, राहुल कुशवा २-१८); सामनावीरः सुरज झा;
फोटो ओळीः पुणे रेंजर्स क्रिकेट क्लब आणि सॅफरॉन क्रिकेट क्लब यांच्या सामन्यातील क्षण.
फोटो १ आणि २: सॅफरॉन क्रिकेट क्लबचा फलंदाज गिरीष कोंडे, पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबचा गोलंदाज देव चौधरी याच्या गोलंदाजीवर फटका मारताना.