Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket News: क्रिकेटच्या मैदानात पंचांकडे असणाऱ्या ‘या’ पाच उपकरणांची तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या त्यांचे पडद्यामागचे काम

क्रिकेटच्या मैदानात पंच सामना नियंत्रित करण्यासाठी कोणती उपकरणे वापरतात? बॉल गेज, बॅट गेज आणि लाईट मीटरचा वापर कधी केला जातो? जाणून घ्या क्रिकेटच्या नियमांशी निगडित या रंजक गोष्टी.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 11, 2026 | 04:33 PM
क्रिकेटच्या मैदानात पंचांकडे असणाऱ्या 'या' पाच उपकरणांची तुम्हाला माहिती आहे का? (Photo Credit- X)

क्रिकेटच्या मैदानात पंचांकडे असणाऱ्या 'या' पाच उपकरणांची तुम्हाला माहिती आहे का? (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • मैदानातील तिसरा डोळा
  • क्रिकेट अंपायर्स वापरतात ‘ही’ ५ महत्त्वाची उपकरणे
  • जाणून घ्या त्यांचे काम
Cricket Umpire Equipment: टीम इंडिया आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्याची एकदिवासीय मालिका खेळवली जात आहे. ज्यातील पहिला एकदिवसीय सामना आज बीसीए स्टेडियम, कोटाम्बी, वडोदरा येथे खेळला जात आहे. तसेच टाटा महिला प्रीमियर लीगही सुरु आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचे भरपूर मनोरंजन होणार आहे. दरम्यान, क्रिकेटच्या मैदानात खेळाडूंच्या कामगिरीसोबतच पंचांच्या (Umpires) निर्णयांकडे सर्वांचे लक्ष असते. मात्र, एक सामना सुरळीत पार पाडण्यासाठी पंच केवळ आपल्या अनुभवावर अवलंबून नसून, ते अनेक तांत्रिक उपकरणांची मदत घेतात. चेंडूचा आकार तपासण्यापासून ते प्रकाशाची तीव्रता मोजण्यापर्यंत, पंचांच्या ताफ्यात कोणती महत्त्वाची साधने असतात, त्याची माहिती आपण जाणून घेवूया.

1. अंपायर काउंटर (Umpire Counter)

मैदानावरील पंचांच्या हातात असलेले सर्वात छोटे पण महत्त्वाचे साधन म्हणजे ‘अंपायर काउंटर’. याद्वारे पंच टाकलेले चेंडू, झालेली षटके आणि पडलेल्या विकेट्सचा अचूक हिशोब ठेवतात. उदाहरणार्थ, एखादी विकेट पडल्यानंतर पंच बाजूचा डायल फिरवतात, ज्यामुळे काउंटर शून्यावरून एकावर सरकतो. यामुळे मानवी चुकीमुळे स्कोअरमध्ये गोंधळ होण्याची शक्यता कमी होते.

Photo Credit – X

2. बॉल गेज (Ball Gauge)

सामन्यादरम्यान चेंडू वारंवार जमिनीवर आदळल्यामुळे त्याचा आकार खराब होण्याची शक्यता असते. अशा वेळी ‘बॉल गेज’चा वापर केला जातो. यामध्ये दोन जोडलेल्या रिंग असतात एक किमान व्यासाची आणि दुसरी कमाल व्यासाची. जर चेंडू लहान रिंगमधून सहज बाहेर पडला किंवा मोठ्या रिंगमध्ये अडकला, तर त्याचा आकार बदलला आहे असे मानून तो त्वरित बदलला जातो.

Photo Credit- X

3. बॅट गेज (Bat Gauge)

बॅटची रुंदी, जाडी आणि टोकाकडील भागाची (Edges) जाडी आयसीसीच्या (ICC) नियमांनुसार असणे बंधनकारक आहे. एखादी बॅट मर्यादेपेक्षा जास्त जाड किंवा रुंद नाही ना, हे तपासण्यासाठी पंच बॅट गेजचा वापर करतात. बॅट या गेजमधून आरपार जाणे आवश्यक असते.

Photo Credit- X

विराट कोहलीने सौरव गांगुलीचा मोडला विक्रम, भारतासाठी सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणारा पाचवा खेळाडू; टॉप-4 मध्ये या नावांचा समावेश

4. स्टंप गेज (Stump Gauge)

क्रिकेटमध्ये स्टंपची एकूण रुंदी बरोबर 9 इंच असणे आवश्यक असते. खेळपट्टी तयार करताना स्टंप्ससाठी जमिनीत योग्य अंतरावर छिद्रे पाडण्यासाठी स्टंप गेजचा वापर केला जातो. यामुळे स्टंप्समधील अंतर आणि त्यांची मांडणी नियमानुसार असल्याची खात्री पटते.

Photo Credit- X

5. लाईट मीटर (Light Meter)

कसोटी सामन्यांमध्ये खराब हवामानाचा किंवा कमी प्रकाशाचा खेळावर मोठा परिणाम होतो. अशा वेळी पंच ‘लाईट मीटर’चा वापर करून प्रकाशाची तीव्रता ‘लक्स युनिट्स’मध्ये मोजतात. जर प्रकाश खेळण्यासाठी अपुरा आणि खेळाडूंसाठी असुरक्षित असेल, तर पंच सामना स्थगित करण्याचा किंवा मैदानावरील फ्लडलाईट्स सुरू करण्याचा निर्णय घेतात. क्रिकेटमधील हे तांत्रिक बारकावे खेळ अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध बनवण्यास मदत करतात.

Photo Credit- X

Rishabh Pant Injury : ही कोणती माणुसकी गिल आणि गंभीर…? ऋषभ पंत जमीनीवर कोसळला पण केलं दुर्लक्ष, Video Viral

Web Title: 5 essential tools used by cricket umpires and their functions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • cricket news
  • IND vs NZ
  • Sports
  • Sports News

संबंधित बातम्या

2026 T20 World Cup मध्ये हा गोलंदाज ठरू शकतो भारतीय संघासाठी ट्रम्प कार्ड! सौरव गांगुलीने केली भविष्यवाणी
1

2026 T20 World Cup मध्ये हा गोलंदाज ठरू शकतो भारतीय संघासाठी ट्रम्प कार्ड! सौरव गांगुलीने केली भविष्यवाणी

Rishabh Pant Injury : ही कोणती माणुसकी गिल आणि गंभीर…? ऋषभ पंत जमीनीवर कोसळला पण केलं दुर्लक्ष, Video Viral
2

Rishabh Pant Injury : ही कोणती माणुसकी गिल आणि गंभीर…? ऋषभ पंत जमीनीवर कोसळला पण केलं दुर्लक्ष, Video Viral

IND vs NZ Toss Update : गिलने नाणेफेक जिंकले, करणार गोलंदाजी! जाणून घ्या दोन्ही संघाची Playing 11
3

IND vs NZ Toss Update : गिलने नाणेफेक जिंकले, करणार गोलंदाजी! जाणून घ्या दोन्ही संघाची Playing 11

Rahul Dravid Birthday : जेव्हा जग द्रविडसमोर नतमस्तक झाले…आजही त्या पाच विक्रमांची नोंद रेकाॅर्डबुकमध्ये!
4

Rahul Dravid Birthday : जेव्हा जग द्रविडसमोर नतमस्तक झाले…आजही त्या पाच विक्रमांची नोंद रेकाॅर्डबुकमध्ये!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.