काही दिवसांपूर्वी बंगळुरुमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला होता. अजाण चालू असताना हनुमान चालीसा लावल्याने मुकेश नावाच्या एका दुकानदाराला मारहाण करण्यात आली. कारण मुकेशने अजाण चालू असताना दुकानांमध्ये हनुमान चालीसा लावली होती. या प्रकरणी मुकेशवर अनेक आरोप देखील करण्यात आले होते. तसेच या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार पोलिसांनी आरोपी विरोधात कारवाई केली. दुकानदारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर FIR नोंदवण्यात आली आहे. हा सर्व प्रकार कर्नाटकमधील बंगळुरुमध्ये घडला आहे.
मुकेशला मारहाण केल्यानंतर अटक करण्यात आलेला आरोपी सुलेमान यांची आई महजबीनने FIR नोंदवली आहे. या प्रकरणी एका वर्तमान पत्रामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. महजबीनने दुकानदारा विरोधात फआयआर नोंदवला. मुकेशने अजाण चालू असताना मोठ्या आवाजामध्ये हनुमान चालीसा लावली होती. त्याआधी त्याने स्पीकरच्या आवाज हळू ठेवला होता. त्यानंतर अजाण सुरु झाल्यावर मुकेशने स्पीकरच्या आवाज वाढवला. त्यावेळेस सुलेमान आणि त्याच्या मित्राने मुकेशला थांबवले, मात्र मुकेश त्यांच्यासोबत वाद घालू लागला. सुलेमानच्या आईने संगितल्यानुसार, आधी मुकेशने मारहाण सुरु केली.
मुकेश सोबत मारहाणीचा प्रकार १७ मार्च रोजी घडला. मुकेशसोबत सुलेमान, शाहनवाज, रोहित, दानिश, तरुण आणि अन्य एका अल्पवयीन आरोपीची पोलिसांकडून ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. मुकेशने संगितले आहे, ४ ते ५ जण दुकानावर आले आणि त्यांनी भजन बंद करायला सांगितले. त्यांच्यासोबत वाद झाला. त्यानंतर त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता नेमकं या प्रकरणी काय होणार? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. घटना घडल्यानंतर तीन दिवसांनी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. कोर्टाने दिलेल्या परवानगीनंतर आयपीसीच्या कलम ३२३, ५०४आणि ५०६ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. संपूर्ण मारहाणीचे रेकॉर्डिंग सीसीटीव्हीमध्ये झाले आहे.