हिंदू कुटुंबात जन्मलेल्या A.R. Rahman यांनी इस्लाम धर्म का स्वीकारला ? नाव बदलण्याचं कारण काय ?
गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहणाऱ्या गायक आणि संगीतकार ए. आर. रहमान यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये एकमेकांपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला. तब्बल लग्नाच्या २९ वर्षांनंतर ए आर रहमान आणि सायरा बानो दोघेही वेगळे होणार आहेत. आपल्या वेगवेगळ्या गाण्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणाऱ्या ए. आर. रहमान यांचा जन्म जन्म झाला आहे. जन्मत: हिंदू कुटुंबामध्ये जन्मलेल्या रहमान यांना इस्लाम धर्म का स्वीकारला ? असं नेमकं काय घडलं की त्यांनी हिंदू धर्म सोडला? नाव का बदललं ? आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया…
“देवा आला रं…” शाहिद कपूरच्या Deva चित्रपटाचा ॲक्शन- रावडी टीझर रिलीज
प्रसिद्ध गायक आणि संगीत दिग्दर्शक ए. आर. रहमान यांचे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात करोडो चाहते आहेत. त्यांनी आजवर गायलेल्या गाण्यांच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या मनामध्ये स्वत:चं स्थान प्रस्थापित केले आहे. रोजा, बॉम्बे पासून ते लगान, स्लमडॉग मिलेनिअर, रॉकस्टार पर्यंत.. अनेक चित्रपटांची सुमधुर गाणी घडवणारे, प्रतिभावान संगीतकार ए.आर. रेहमान आज आपला ५८ वा वाढदिवस साजरा करीत आहेत. त्यांनी गायलेले अनेक गाणे प्रत्येक वयोगटातल्या चाहत्यांच्या म्युझिकमध्ये फेव्हरेट लिस्टमध्ये आहेत. तुमच्या आमच्या आवडत्या गायक आणि संगीतकार ए. आर. रहमान यांचं खरं नाव वेगळंच आहे. कदाचित तुम्हालाही माहित नसेल.
अभिनेता किरण मानेने शेअर केली Mufasa The Lion King साठी खास पोस्ट, केलं किंग खानचं विशेष कौतुक
आपल्या आवडत्या बॉलिवूड गायक आणि संगीतकार ए. आर. रहमान यांचं खरं नाव दिलीप कुमार आहे. मूळचे हिंदू कुटुंबात जन्मलेल्या रहमान यांनी वयाच्या २३ व्या वर्षी इस्लाम धर्म स्वीकारला आणि नवं नावही बदललं. खरंतर, ए.आर. रहमान हा जन्माने हिंदू होता, पण वयाच्या 23 व्या वर्षी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. धर्मांतर करण्यामागे त्यांच्या आईचा मोठा प्रभाव होता. ए. आर. रेहमान यांच्या बालपणी त्यांच्या घरची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती अतिशय बेताची होती. गायकाच्या वडिलांचं नाव आर. के. शेखर असं होतं. पण त्यांनी वयाच्या २३ व्या वर्षी इस्लाम धर्म स्वीकारला आणि नाव बदलून A R Rahman असं केलं.
नाव आणि धर्म बदलण्याचं कारण ए. आर. रेहमान यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. ए. आर. रेहमान मुलाखतीत सांगितलंय की, कर्करोगाने त्रस्त असलेल्या त्याच्या वडिलांवर शेवटच्या काळात एका सुफीने उपचार केले होते. ७ ते ८ वर्षांनंतर, जेव्हा ए.आर. रहमान एका सूफीला त्यांच्या कुटुंबासह भेटले, तेव्हा ते त्यांच्या बोलण्याने खूप प्रभावित झाले आणि त्यांनी दुसरा धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले- एक सूफी होता जो मृत्यूपूर्वी आपल्या वडिलांवर उपचार करत होता. त्याला पुन्हा भेटल्यावर, आम्ही आणखी एक आध्यात्मिक मार्ग स्वीकारला, ज्यामुळे आम्हाला खूप शांती मिळाली. एआर रहमानला त्याचे नाव दिलीप कुमार आवडत नव्हते. त्यांचे नाव त्यांच्या प्रतिमेशी जुळत नसल्याचे ते म्हणालेले.